Social Media users in 2025 eSakal
विज्ञान-तंत्र

Social Media : येत्या दोन वर्षात जगातील निम्मे यूजर्स सोडणार सोशल मीडिया - रिपोर्ट

Social Media Users : काही वर्षांपूर्वी जे यूजर्स अगदी मोकळेपणाने सोशल मीडिया वापरत होते, ते आता जास्त वैयक्तिक माहिती शेअर करत नाहीयेत.

Sudesh

Social Media Toxicity : सोशल मीडियावर वाढत चाललेल्या नकारात्मकतेमुळे कंपन्यांना मोठा तोटा होणार असल्याची चिन्हं दिसत आहेत. फेक न्यूज आणि मिसइन्फॉर्मेशन यामुळे जगभरातील 50 टक्क्यांहून अधिक यूजर्स 2025 सालापर्यंत सोशल मीडियाला रामराम ठोकू शकतात. गार्टनर नावाच्या कंपनीने केलेल्या सर्वेक्षणात ही बाब उघड झाली आहे.

एआयमुळे होतंय मोठं नुकसान

या सर्वेक्षणात (Gartner Survey) यूजर्सना सोशल मीडिया आणि जनरेटिव्ह एआयबाबत प्रश्न विचारण्यात आले. यामध्ये दहापैकी सात यूजर्सने असं म्हटलं, की जनरेटिव्ही एआयमुळे सोशल मीडिया यूजर एक्सपिरियन्सला मोठा फटका बसेल. "सोशल मीडिया (Social Media) हा डिजिटल मार्केटिंगसाठी सध्या सगळ्यात मोठा प्लॅटफॉर्म आहे. मात्र, कित्येक लोक हे सोशल मीडियाचा वापरच कमी करत आहेत." असं गार्टनर मार्केटिंगच्या वरिष्ठ संशोधक एमिली वेईस यांनी स्पष्ट केलं.

"काही वर्षांपूर्वी जे यूजर्स (Social Media Users) अगदी मोकळेपणाने सोशल मीडिया वापरत होते, ते आता जास्त वैयक्तिक माहिती शेअर करत नाहीयेत. सोशल मीडियावर पोस्ट करण्याचं प्रमाणही कमी झालं आहे. यामुळे कंपन्यांनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या बदलत्या स्वरुपावर काम करणं गरजेचं आहे." असंही एमिली म्हणाल्या.

सध्या एआय आणि डीपफेकचं (Deepfake) प्रमाण वाढल्यामुळे यूजर्सना सोशल मीडियावर असुरक्षित वाटत आहे. यामुळेच यूजर्स अशा प्लॅटफॉर्मना प्राधान्य देत आहेत, ज्यामध्ये एआयचा प्रभाव कमी असेल. 2025 पर्यंत सोशल मीडिया वापरणं बंद करू शकतो, असं 53% यूजर्सनी म्हटलं आहे. 2028 पर्यंत सोशल मीडिया ब्रँड्सचं ऑर्गॅनिक सर्च ट्रॅफिक हे 50 टक्क्यांपेक्षा जास्त प्रमाणात कमी होईल; असंही एमिली यांनी स्पष्ट केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT