Independence Day Red Fort Security to Feature AI-Powered Surveillance and Crowd Monitoring esakal
विज्ञान-तंत्र

Independence Day 2024 : स्वातंत्रदिनी लाल किल्ल्यावर AI चा पहारा; कशी असणार सुरक्षाव्यवस्था? काय आहे खास...

Saisimran Ghashi

AI Technology For Security : देशाच्या ७८ व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्त दिल्लीतील लाल किल्ल्यावर आणि त्या परिसरात सुरक्षा व्यवस्थेला चांगलेच बळकटी मिळणार आहे. यावेळी सुरक्षा दलांच्या हातात आधुनिक तंत्रज्ञानाचे शस्त्र असणार आहे.

या वर्षी लाल किल्ल्यावर आणि त्या परिसरात AI आधारित कॅमेरा सिस्टम बसवण्यात येणार आहे. या कॅमेऱ्यांमध्ये अनेक अत्याधुनिक फीचर्स आहेत. यामध्ये गर्दीचे अंदाज बांधणे, चेहऱ्याची ओळख पटवणे, वाहनांचे नंबर प्लेट ओळखणे यासारखे फीचर्स आहेत. या कॅमेऱ्यांद्वारे लाल किल्ल्याच्या प्रवेश आणि बाहेर जाण्याचा मार्ग यावर कडक नजर ठेवली जाणार आहे. या कॅमेऱ्यांमधून मिळालेली माहिती सुरक्षा अधिकाऱ्यांना देण्यात येईल. याशिवाय या कॅमेऱ्यांना सोडून गेलेले सामान आणि अनाधिकृत प्रवेश यांचीही नोंद घेता येईल.

याशिवाय लाल किल्ल्यावर आणि त्या परिसरात एकूण ७०० सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. त्यापैकी १५० पेक्षा जास्त कॅमेरे अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित असतील. याशिवाय १० हजारांहून अधिक सुरक्षा अधिकारी या कार्यक्रमाच्या सुरक्षेसाठी तैनात असतील.

चेहऱ्याची ओळख पटवण्याची प्रणाली गेल्या काही वर्षांपासून वापरात असली तरी यावर्षी एक नवीन नंबर प्लेट ओळखणारी प्रणाली सुरू करण्यात येणार आहे. या प्रणालीद्वारे लाल किल्ल्याच्या आत आणि बाहेर जाणाऱ्या प्रत्येक वाहनांचे व्हिडिओ आणि फोटो काढले जातील. तसेच या प्रणालीद्वारे वाहनाच्या चालकाचा फोटो काढता येईल.

या सर्व उपाययोजनांमुळे यावर्षी स्वातंत्र्य दिनाच्या सुरक्षेला एक नवी उंची मिळणार आहे. त्यामुळे सर्व नागरिकांना सुरक्षित वातावरणात हा राष्ट्रीय उत्सव साजरा करता येईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amol Mitkari Ravan Puja: "रावणानं बाप म्हणून सीतेचं अपहरण केलं"; अमोल मिटकरींच्या दाव्यानं वादाची शक्यता

Dussehra Melava 2024 Live Updates: कोल्हापुरातील ऐतिहासिक शाही दसरा काहीच वेळात सुरू होणार

Wall Collapse in Gujarat : गुजरातमध्ये भीषण दुर्घटना! जमीन खचल्याने ७ मजुरांचा मृत्यू; ४ ते ५ जण अजूनही अडकल्याची भीती

Eknath Shinde यांच्या दसरा मेळाव्यावर संकट! आझाद मैदान परिसरात पावसाची हजेरी, शिवसैनिकांची तारांबळ

Latest Maharashtra News Updates : पनवेलकरांच्या मालमत्ता करावरील शास्ती माफ

SCROLL FOR NEXT