Emergency Alert System Test eSakal
विज्ञान-तंत्र

Emergency Alert : सरकारने पुन्हा पाठवला इमर्जन्सी अलर्ट! तुम्हालाही मिळाला का? जाणून घ्या हे काय आहे

Required Monthly Test : ही केवळ चाचणी असून, यावर कोणतीही प्रतिक्रिया अपेक्षित नसल्याचं या नोटिफिकेशनमध्ये सांगण्यात आलं आहे.

Sudesh

भारत सरकारने काही दिवसांपूर्वी इमर्जन्सी अलर्टची चाचणी करणारा संदेश सर्व अँड्रॉईड स्मार्टफोनवर पाठवला होता. आज दुपारी 12.49 च्या सुमारास असाच आणखी एक संदेश कित्येक स्मार्टफोनवर पाहायला मिळाला. ही केवळ चाचणी असून, यावर कोणतीही प्रतिक्रिया अपेक्षित नसल्याचं या नोटिफिकेशनमध्ये सांगण्यात आलं आहे.

काय म्हटलंय संदेशात?

"केंद्र सरकारच्या टेलिकम्युनिकेशन विभागाने पाठवलेला हा केवळ 'सॅम्पल टेस्टिंग मेसेज' आहे. कृपया याकडे दुर्लक्ष करा. याबाबत तुम्हाला कोणतीही कृती करण्याची आवश्यकता नाही. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सध्या एक पॅन-इंडिया इमर्जन्सी अलर्ट सिस्टिम लागू करत आहे. त्याची ही चाचणी आहे." अशी माहिती या संदेशात देण्यात आली आहे.

मराठीतही आला अलर्ट

इंग्रजीमध्ये अलर्ट मिळाल्यानंतर थोड्याच वेळाने मराठीमध्येही अशीच सूचना मिळाली. यामध्येही सारखीच माहिती देण्यात आली होती. दुपारी 12.56 वाजता हा मराठीमधील संदेश मिळाला. गेल्या महिन्यात देखील अशाच प्रकारची चाचणी घेण्यात आली होती. (Govt of India)

काय आहे ही सिस्टीम?

इमर्जन्सी अलर्ट सिस्टीम या प्रणालीच्या माध्यमातून देशातील जवळपास सर्व स्मार्टफोनवर एकाच वेळी धोक्याचा इशारा देणं शक्य होणार आहे. एखाद्या नैैसर्गिक आपत्तीवेळी किंवा आणीबाणीच्या प्रसंगी एकाच वेळी सर्व नागरिकांना अलर्ट करण्यासाठी याचा वापर करण्यात येईल. सध्या याची केवळ चाचणी सुरू आहे.

मोबाईलमध्ये बदला ही सेटिंग

तुम्हाला जर हा अलर्ट मिळाला नसेल, किंवा भविष्यात अशा प्रकारचे अलर्ट मिळावेत यासाठी मोबाईलमध्ये एक सेटिंग बदलण्याची गरज आहे. इमर्जन्सी अलर्ट सेटिंग सुरू करण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी फोनच्या सेटिंग्समध्ये जावं लागेल. त्यानंतर स्क्रोल डाऊन करून सेफ्टी अँड इमर्जन्सी हा पर्याय शोधा.

यामध्ये गेल्यानंतर पुन्हा स्क्रोल डाऊन करून 'Wireless Emergency Alerts' हा पर्याय निवडा. याठिकाणी Allow Alerts हा पर्याय तुम्हाला बंद दिसेल. याच्या टॉगलवर टॅप करून हा पर्याय सुरू करा. यानंतर तुम्हाला वेळोवेळी इमर्जन्सी अलर्ट मिळतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhananjay Mahadik : 'या मुन्नाचा भांगसुद्धा कोणी वाकडा करू शकत नाही'; खासदार महाडिकांचा उद्धव ठाकरेंना सणसणीत टोला

जीगर लागतो...! खांद्याला दुखापत, तरीही ऑस्ट्रेलियन खेळाडूने संघासाठी एका हाताने केली फलंदाजी

Waris Pathan: वारिस पठाण पत्रकार परिषद सुरु असतानाच ढसाढसा रडले, म्हणाले, सगळेच माझ्या मागे हात धुवून मागे लागले अन...

मृणाल दुसानिस झाली बिसनेसवूमन! ठाण्यात 'या' ठिकाणी सुरू केलं नवं हॉटेल; पाहा आतून कसं आहे अभिनेत्रीचं 'बेली लाफ्स'

बाळासाहेबांची मोठी भूमिका, पंतप्रधानांचा थेट सदानंद सुळेंना फोन... सुप्रिया सुळेंनी सांगितला लग्नाचा 'तो' किस्सा!

SCROLL FOR NEXT