Passport Tips esakal
विज्ञान-तंत्र

Passport Tips : घरबसल्या Passport मधील पत्ता मोबाईलमध्ये कसा अपडेट कराल? वाचा सोपी ट्रिक

तुम्ही तुमचा स्मार्टफोन वापरून तुमच्या पासपोर्टवरील पत्ता देखील बदलू शकता

सकाळ ऑनलाईन टीम

Passport Tips : जर तुम्ही नुकताच तुमच्या घराचा पत्ता बदलला असेल आणि तुम्हाला हा नवीन पत्ता तुमच्या पासपोर्टमध्ये अपडेट करायचा असेल, तर त्यासाठी तुम्हाला कोणत्याही व्यक्तीला लाच देण्याची गरज नाही किंवा सरकारी कार्यालयात जाण्याची गरज नाही. तुम्ही तुमचा स्मार्टफोन वापरून तुमच्या पासपोर्टवरील पत्ता देखील बदलू शकता.

मात्र, बहुतेक लोकांना हे माहिती नसते आणि म्हणूनच त्यांना इतर लोकांची आवश्यकता असते. जर तुम्हाला तुमच्या पासपोर्टमध्ये नवीन पत्ता अपडेट करायचा असेल, तर आज आम्ही तुम्हाला जे सांगणार आहोत त्याचा तुम्हाला खूप फायदा होईल.

ही एक अतिशय सोपी प्रक्रिया आहे, जर तुम्हाला अजून पासपोर्टमधील पत्ता कसा बदलायचा हे माहित नसेल, तर आज या बातमीच्या माध्यमातून आम्ही तुमची अडचण थोडीशी सोपी करणार आहोत आणि तुम्हाला सांगणार आहोत की तुम्ही घरी बसून तुमचा पत्ता कसा बदलू शकता. तुमच्या स्मार्टफोन किंवा लॅपटॉपच्या मदतीने तुमच्या पासपोर्टमधील पत्ता कसा बदलायचा ते वाचा.

पासपोर्टमध्ये पत्ता कसा बदलायचा

पत्ता बदलण्यासाठी, तुमच्याकडे ECR/Non ECR पेजसह जुन्या पासपोर्टच्या पहिल्या 2 पेजच्या आणि शेवटच्या 2 पेजच्या सिग्नेचर्ड कॉपी असणे आवश्यक आहे. त्यासाठी पत्त्याचा पुरावाही आवश्यक आहे.

पत्ता बदलण्याची ही ऑनलाइन प्रक्रिया आहे

प्रथम पासपोर्ट सेवा पोर्टलवर जा

अकाउंटमध्ये लॉग इन केल्यानंतर, यूजर आयडी आणि पासवर्ड टाका

तुमच्याकडे अकाउंट नसल्यास, New User/Register Now वर क्लिक करा

आता तुम्हाला पासपोर्ट सेवा केंद्र सिलेक्ट करा

आता तुमचे नाव, जन्मतारीख आणि वैयक्तिक माहिती प्रविष्ट करा

यानंतर लॉगिन आयडी आणि पासवर्ड तयार करा

तुमचे अकाउंट अॅक्टिव्ह करण्यासाठी तुमच्या रजिस्टर्ड ईमेल आयडीवर एक लिंक पाठवली जाईल.

लॉगिन केल्यानंतर, फ्रेश पासपोर्ट/री-इश्यू ऑफ पासपोर्ट या पर्यायावर क्लिक करा

आता अर्ज भरण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा

विचारले जाणारी सर्व माहिती भरा, Next बटणावर क्लिक करा (Passport)

मेनूमधून सेव्ह View Saved/Submitted Applications  अर्ज फॉर्म पहा निवडा

त्यानंतर पे आणि शेड्यूल अपॉइंटमेंट लिंकवर क्लिक करा

त्यानंतर ऑनलाइन पेमेंट मोड निवडा. त्यानंतर Next बटणावर क्लिक करा

PSK लोकेशन सिलेक्ट केल्यानंतर, पासपोर्ट पावतीची प्रिंट आउट घ्या (technology)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसे शिंदेंच्या लढतीचा आदित्य ठाकरेंचा फायदा

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: दुसऱ्या फेरी अखेर माहीममध्ये अमित ठाकरे पिछाडीवर

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT