Green Spots on Mars Signal Life eskal
विज्ञान-तंत्र

Green Spots on Mars : खुशखबर! मंगळावर पुन्हा सापडली जीवसृष्टीची चिन्हे; नासाच्या Perseverance Rover ने लाल ग्रहावर काय पाहिलं?

Mars Green Spot LIfe Signals : नासाच्या पर्सिव्हिअरन्स रोव्हरने मंगळावरच्या संशोधनात एक नवा रहस्यमय शोध लावला आहे.

Saisimran Ghashi

Life on Mars : नासाच्या पर्सिव्हिअरन्स रोव्हरने मंगळावरच्या संशोधनात एक नवा रहस्यमय शोध लावला आहे. मंगळाच्या लालसर भूमीवर हिरवट रंगाचे डाग आढळल्याने मंगळावर जीवसृष्टी असण्याच्या शक्यतेबाबत वैज्ञानिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

काय आहे शोध?

रोव्हरने ‘सर्पेन्टाईन रॅपिड्स’ नावाच्या भागात "वॉलेस ब्यूट" या लाल रंगाच्या खडकावर संशोधन केले असता पांढरा, काळा आणि एक विशेष हिरवट रंगाचा स्पॉट आढळला. या हिरवट रंगाचे डाग गडद आणि फिकट छटांनी बनलेले होते. पृथ्वीवरही असे हिरवे डाग जुन्या "रेड बेड्स" मध्ये आढळतात, जे साधारणपणे पाण्यातील लोहाच्या रासायनिक प्रक्रियेमुळे तयार होतात.

जीवसृष्टीचा पुरावा?

पृथ्वीवर या प्रकारचे हिरवे डाग जैविक किंवा रासायनिक प्रक्रियांमुळे बनलेले असतात. मंगळावरही असे डाग असण्याचे कारण काय असू शकते याचा उलगडा अद्याप झाला नसला, तरी यामुळे मंगळावर पाण्याशी संबंधित जीवनाच्या शक्यतेबद्दल चर्चा वाढली आहे.

पुढील संशोधनाची वाटचाल जेझेरो क्रेटरमधील या शोधामुळे मंगळाच्या भूविज्ञानाबद्दल वैज्ञानिकांना नव्या दिशेने विचार करण्यास प्रवृत्त केले आहे. पुढील संशोधनात अजून कोणती रहस्यमय गोष्ट उलगडेल, याची उत्सुकता वैज्ञानिकांना आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Vs Sharad Pawar : दीड लाखांनी जिंकणारे अजित पवार यंदा 'इतक्या' मतांनी पडणार; निकालापूर्वीच जानकरांचा मोठा दावा

खुर्चीवरून उठवलं, हात पकडला अन्... चक्क सासूबाईंसोबत डान्स करताना दिसला किंग खान; व्हिडिओ वायरल

Latest Maharashtra News Updates : जोगेश्वरी विधानसभेच्या उमेदवार मनीषा रवींद्र वायकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल

विराटनं आता देशांतर्गत क्रिकेट खेळायला हवं! माजी सहकाऱ्याचा किंग कोहलीला सल्ला

Chhatrapati Sambhajinagar Crime : हवेत गोळ्या झाडण्याचे रील फेमस झालं अन् इंस्टावर राडा करणाऱ्या संभाजीनगरच्या राखी मुरमुरेला अटक...

SCROLL FOR NEXT