Blue Whale Love Letters : पुण्यातल्या रावेतमधल्या एका 15 वर्षीय मुलाने ब्लू व्हेल गेमच्या विळख्यात अडकून आत्महत्या केल्याच्या घटनेनंतर 'ब्लू व्हेल चॅलेंज' पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. हा एक रहस्यमय ऑनलाइन गेम म्हणून ओळखला जातो ज्यात तरुणांना ५० दिवसात ५० आव्हाने पूर्ण करायची असतात. या खेळाचे जगभरातील अनेक तरुणांच्या आत्महत्येशी संबध असल्याचे सांगण्यात येते. पण या खेळामागील सत्य काय आहे?
पुण्यातल्या रावेतमधल्या एका 15 वर्षीय मुलाने गेमच्या विळख्यात अडकून आत्महत्या केल्यानंतर
या कथेची सुरुवात रीना पॅलेनकोवा नावाच्या एका तरुणीपासून होते. २२ नोव्हेंबर २०१५ रोजी रशियातील दक्षिण-पूर्वेकडील भागात राहणाऱ्या रीनाने एक सेल्फी पोस्ट केली. फोटोमध्ये ती बाहेर उभी होती. तसेच तिच्या हातावर कोरड्या रक्ताचे डाग दिसत होते. फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले होते, "न्या बाय". दुसऱ्या दिवशी तिने आत्महत्या केली.
रीना पॅलेनकोवाच्या मृत्यूची चर्चा रशियातील सर्वात मोठ्या सोशल नेटवर्क व्हाट्सअॅपवर झाली. या फोरमवर तरुणांमध्ये शाळा, वर्गमित्र यासारख्या सामान्य गोष्टींच्या चर्चेबरोबरच, डिप्रेसन, एकटेपणा आणि आत्महत्या यासारख्या गंभीर विषयांचीही चर्चा होत असे.
या गटांमध्ये रीनाबद्दलच्या अफवा पसरल्या. काही जणांनी तिच्या आत्महत्येचे कौतुक केले. तिच्या शेवटच्या क्षणांचे व्हिडिओ ऑनलाइन पोस्ट करण्यात आले.
पण या सर्व अफवांमध्ये एक प्रश्न निर्माण झाला. रशियन अकॅडमी ऑफ नॅशनल इकॉनॉमी अँड पब्लिक अॅडमिनिस्ट्रेशनमधील वरिष्ठ संशोधक दारिया राडचेन्को यांच्या मते, "खरं तर, तिच्या आत्महत्येमागील खरी गोष्ट कोणालाही माहित नव्हती." असा दावा करण्यात आला होता.
त्यानंतर लवकरच रीनाची कहाणी इतर किशोरवयीन मुलांच्या आत्महत्येच्या घटनांशी जोडली गेली. २५ डिसेंबर २०१५ रोजी रशियातील रियाझान शहराला रहणारी १२ वर्षीय अँजेलिना डेविडोव्हाने आत्महत्या केली. त्याच्या काही दिवसांनी त्याच शहरातील डायना कुझनेत्सोव्हानेही आत्महत्या केली.
जेव्हा या मुलींच्या पालकांनी त्यांच्या ऑनलाइन अकाउंट्स तपासले तेव्हा त्यांना आश्चर्यकारक गोष्ट आढळली. दोन्ही मुली एकसारख्याच ऑनलाइन गटांचा भाग होत्या. या गटांमध्ये रीना पॅलेनकोवाचे चित्र, आत्महत्येबद्दलचे पोस्ट आणि निळ्या व्हेलचे अनेक उल्लेख होते.
यावरून असे दिसून येते की, 'ब्लू व्हेल चॅलेंज' ही कदाचित एक काल्पनिक कथा असावी जी अनेक तरुणांच्या मनावर परिणाम करत आहे.
या खेळाचे निर्माते फिलिप बुडेकिनला जेल झाल्यानंतरही तो खेळ अजूनही तरुणांना आपल्या जाळ्यात ओढत होता.
रशियन न्यायालयाने बुडेकिनला रशियन तरुणांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तीन वर्षांची शिक्षा सुनावली. त्याने स्वतः कबूल केले होते की, तो किशोरवयीन मुलांना मानसिकदृष्ट्या कमकुवत करून त्यांना आत्महत्येस प्रवृत्त करायचा.
'ब्लू व्हेल चॅलेंज' हा खेळ २०१३ पासून सुरू आहे. बुडेकिन ऑनलाइन किशोरवयीन मुलांशी संपर्क साधून त्यांना या खेळात सामील करून घेत असे. तो त्यांना वेगवेगळे धोकादायक काम करायला सांगायचा, जसे की स्वतःला जखमी करणे, प्राण्यांना मारणे आणि शेवटी आत्महत्या करणे.
ज्या जेलमध्ये फिलिपला ठेवण्यात आले होते ते जेलच्या एका अधिकाऱ्याने त्यावेळी धक्कादायक खुलासा केला होता की फिलिपला अजूनही असंख्य मुलींची प्रेम पत्र येतात. फिलिपदेखील या पत्रांना फिलिप बुडेल या नावाने उत्तर न देता फिलिप लीस या नावाने उत्तर देतो.
एका मनोवैज्ञानिकाच्या अनुसार ज्या मुली या गेम निर्मात्याला पत्र लिहायच्या त्यांना त्यांच्या परिवारकडून प्रेम आपुलकीची भावना मिळत नसे. या भावना देखील हाच त्यांच्या मनात निर्माण करून द्यायचा. या मुलाकडून त्यांना अटेंशन मिळत आहे तो त्यांची काळजी करत आहे असेच त्यांना वाटायचे. फिलिप या मुलींना सांगायचा की तुम्हाला विशेषरित्या निवडण्यात आले आहे. मुलींना आई-वडिलांनी कधीच प्रेमाने मागवले नाही. त्यामुळे जीवनात फक्त एकच सुंदर सत्य आहे ते म्हणजे मृत्यू. असे सांगून तो मुलींना जाळ्यात ओढत असे आणि त्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करत असे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.