PhonePe : लोकप्रिय फिनटेक कंपनी फोनपे आता तुमच्या सुरक्षित कर्जाच्या गरजांसाठी एक्सक्लुझिव्ह सोल्यूशन घेऊन आली आहे. भारतीया रिझर्व्ह बँकेनं असुरक्षित कर्जावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न सुरू असताना, फोनपेने अनेक प्रमुख NBFC सहकार्याने ही सेवा सुरु केली आहे.
फोनपेच्या माध्यमातून तुम्ही आता तुमच्या म्युच्यूअल फंड्स, सोन्यावर, दुचाकी, चारचाकी वाहनांवर, घरावर तसेच शिक्षणाच्या गरजेसाठीही कर्ज मिळवू शकता. फोनपे लेंडिंगचे सीईओ हेमंत गाला म्हणाले, "या माध्यमातून आम्ही देशभरातील लाखो ग्राहकांना एकाच व्यासपीठावरून कर्जदाते आणि ग्राहकांना जोडणारा पूल तयार करतो आहोत. सध्या सुरक्षित कर्ज प्रक्रियेला आणखी सोपं आणि डिजिटल बनवण्याची ही उत्तम संधी आहे."
फोनपेच्या सध्या 535 दशलक्षाहून अधिक वापरकर्ते आहेत आणि एनबीएफसी यांना या मोठ्या ग्राहकसंख्येतून कर्जासाठी अर्ज करणाऱ्यांचा शोध घेण्याची संधी दिसत आहे. हेच पाहून अलीकडेच लॅण्ड अँड टी फायनान्स कंपनीने घरासाठी नवीन कर्ज योजना जाहीर केली आहे, ज्यामध्ये घराच्या आतील स्वरूपाची रचना करण्यासाठीही अतिरिक्त कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे.
याच संदर्भात लॅण्ड अँड टी फायनान्सचे सीईओ सुदिप्त रॉय यांनी सांगितले की, ते फिनटेक कंपन्यांशी भागीदारी करण्याचा विचार करत आहेत जेणेकरून त्यांच्या मोठ्या ग्राहकसंख्येतून कर्जासाठी इच्छुक ग्राहक मिळवता येतील.
त्यांनी पुढे सांगितले, “दोन्ही कंपन्यांची एकत्रित क्षमता आणि संसाधनांचा वापर करून आम्ही आमच्या ग्राहकांच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी सर्वोत्तम कर्ज पर्याय उपलब्ध करून देऊ शकणार आहोत.”
फोनपेच्या या नवीन कर्ज पर्यायामुळे तुमच्या आर्थिक गरजा आता सहज पूर्ण होतील.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.