PhonePe Transaction Limit eSakal
विज्ञान-तंत्र

PhonePe : एका दिवसात करु शकता किती व्यवहार? 'फोन-पे'चे काय आहेत निर्बंध? जाणून घ्या

Sudesh

देशात यूपीआय पेमेंटला सुरुवात झाल्यापासून मोठ्या प्रमाणात डिजिटल व्यवहार वाढले आहेत. अगदी भाजी घेण्यापासून ते गाडी विकत घेण्यापर्यंत लोक यूपीआयचा वापर करतात. देशातील अग्रगण्य यूपीआय अ‍ॅप्समध्ये फोन-पेचा समावेश होतो. मात्र, फोन-पेवरून व्यवहार करण्यासाठी काही निर्बंधही लागू करण्यात आलेले आहेत.

आपल्या यूजर्सची सुरक्षा लक्षात घेऊन, फसवणुकीला आळा बसावा यासाठी फोन-पेने हे निर्बंध लागू केले आहेत. यानुसार एका ट्रान्झॅक्शनमध्ये किती पैसे पाठवता येतात, आणि दिवसाला किती ट्रान्झॅक्शन करू शकता यासाठी लिमिट सेट करण्यात आलेली आहे. इंडिया डॉट कॉम या वेबसाईटने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. (PhonePe Transaction Limit)

दिवसाला किती लिमिट?

फोन-पेने दिलेल्या माहितीनुसार, एक यूजर एका दिवसाला केवळ २० ट्रॅन्झॅक्शन करू शकतो. यातही एक दुसरी अट म्हणजे, दिवसभरात केलेल्या ट्रान्झॅक्शनचं एकूण मूल्य हे एक लाख रुपयांहून अधिक असू शकत नाही. म्हणजेच, फोन-पेच्या माध्यमातून तुम्ही एका दिवसाला केवळ एक लाख रुपये पाठवू शकता.

एका ट्रान्झॅक्शनची लिमिट

तुम्ही एका ट्रान्झॅक्शनमधून कमीत कमी एक रुपयांपासून जास्तीत जास्त एक लाखांपर्यंत रक्कम पाठवू शकता. अर्थात, एका दिवसाला एक लाखांची मर्यादा असल्यामुळे, त्यानंतर तुम्ही दिवसभर कोणतेही ट्रान्झॅक्शन करू शकणार नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोदींचे १० साल 'बेमिसाल', एकनाथ शिंदेंकडून पंतप्रधानांचे तोंडभरून कौतुक, काय म्हणाले?

Bigg Boss Marathi 5 : 'या' तारखेला पार पडणार बिग बॉस मराठीचा ग्रँड फिनाले ? प्रेक्षकांनी ठरवली फायनलिस्टची यादी

iPhone 16 Home Delivery : आयफोन 16 घेण्यासाठी रांगेत कशाला थांबताय? घरपोच मिळणार फक्त 20 मिनिटांत,अशी करा ऑर्डर

Supreme Court: आरबीआय गव्हर्नर यांच्या विरोधात सुप्रीम कोर्टात अवमान याचिका दाखल; काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Updates : पीएम मित्र पार्क हे एक महत्त्वपूर्ण पाऊल - मोदी

SCROLL FOR NEXT