PM Modi on AI eSakal
विज्ञान-तंत्र

PM Modi on AI : "भारतातील मुलं बोलायला लागताच 'आई' सोबत 'एआय' म्हणतात.."; मोदींनी बिल गेट्सला असं का सांगितलं?

PM Modi Bill Gates : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी मायक्रोसॉफ्टचे सर्वेसर्वा बिल गेट्स यांच्यासोबत चर्चा केली होती. या चर्चेचा व्हिडिओ आता प्रसिद्ध करण्यात आला आहे.

Sudesh

PM Modi talks about AI with Bill Gates : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी मायक्रोसॉफ्टचे सर्वेसर्वा बिल गेट्स यांच्यासोबत चर्चा केली होती. या चर्चेचा व्हिडिओ आता प्रसिद्ध करण्यात आला आहे. यावेळी पंतप्रधानांनी आजच्या काळात एआयच्या वापराबद्दल भरपूर गप्पा मारल्या. भारतातील मुलं बोलायला लागताच 'एआय' म्हणतात, असंही मोदी मिश्किलपणे म्हणाले.

"भारतातील कित्येक भाषांमध्ये जन्मदात्रीला 'आई' म्हटलं जातं. लहान मुलांचा पहिला शब्द बहुतांश वेळा आई हाच असतो. मात्र आजकालच्या मुलांचा पहिला शब्द 'एआई' ठरत आहे.. हा केवळ विनोद आहे. मात्र, खरंच आई आणि एआय हे ऐकायला एकसारखंच वाटतं", असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

सामान्यांपर्यंत पोहोचलं एआय

पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले, की भारतातील सर्वसामान्य नागरिकांपर्यंत देखील आता आर्टिफिशिअल इंटेलिजन्स पोहोचलं आहे. "G20 शिखर परिषदेवेळी मी भाषांतरासाठी एआयचा वापर कलेा. यावेळी माझ्या सर्व चालकांनी एआय अ‍ॅप्स डाऊनलोड केले होते, ज्या माध्यमातून ते विविध देशांमधून आलेल्या व्हीआयपी पाहुण्यांशी संवाद साधू शकत होते." असं त्यांनी सांगितलं.

एआयचा गैरवापर टाळणं गरजेचं

यावेळी पंतप्रधानांनी एआयच्या गैरवापराबद्दल चिंताही व्यक्त केली. ते म्हणाले की योग्य प्रशिक्षण न देता एखाद्या व्यक्तीच्या हातात एआय दिल्यामुळे त्याचा गैरवापर होऊ शकतो. एआय-जनरेटेड कंटेंटवर क्लिअर वॉटरमार्क देणं गरजेचं आहे. म्हणजे सामान्यांनाही तो कंटेंट एआय जनरेटेड आहे हे समजेल आणि त्याचा गैरवापर टळेल. भारतासारख्या लोकशाही असलेल्या देशात कोणीही डीपफेक वापरू शकतो. त्यामुळे असा कंटेंट ओळखता येणं गरजेचं आहे, असं ते म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

निवृत्तीपूर्वी CJI DY Chandrachud आमदार अपात्रता प्रकरणावर निकाल देणार? आज सुप्रीम कोर्टात महत्वाची सुनावणी

Pune: पुणे पोलिसांनी 'या' टोळीला केले जेरबंद, वाचा काय होता गुन्हा

Corn Upma Recipe: सकाळी नाश्त्यात झटपट बनवा स्वादिष्ट कॉर्न उपीट, नोट करा रेसिपी

Kolhapur North : मधुरिमाराजेंनी माघार का घेतली? ईगो दुखावला, घरगुती समस्या की अन्य कारण..; उलटसुलट चर्चांना उधाण

Happy Birthday Virat Kohli : किंग कोहलीचे रेकॉर्ड तर तुम्हाला माहित्येय; आज भेटूया त्याच्या कुटुंबियांना, जाणून घेऊ त्यांच्याविषयी

SCROLL FOR NEXT