PM Modi launches nari shakti doot app in mumbai know how it will benefit women marathi news  
विज्ञान-तंत्र

Nari Shakti Doot App : PM मोदींनी लाँच केलं 'नारी शक्ती दूत अ‍ॅप'; याचा महिलांना कसा होणार फायदा? जाणून घ्या

महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाने नमो महिला सहशक्तीकरण अभियानाला चालना देण्यासाठी 'नारी शक्ती दूत अ‍ॅप' च्या माध्यमातून एक मोहीम सुरू करण्यात आले आहे

रोहित कणसे

महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाने नमो महिला सहशक्तीकरण अभियानाला चालना देण्यासाठी 'नारी शक्ती दूत अ‍ॅप' च्या माध्यमातून एक मोहीम सुरू करण्यात आले आहे. महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नवी मुंबईतील एका सार्वजनिक कार्यक्रमात 'नारी शक्ती दूत अ‍ॅप' लाँच केले.

या अ‍ॅपच्या माध्यामातून महिलांना मोठी मदत होणार आहे. याच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना गरजू महिलांबद्दल माहिती घेणे आणि त्यांना मदत करणे शक्य होणार आहे. महिलांना विविध सरकारी योजनांचा लाभ सहज मिळावा यासाठी मदत व्हावी म्हणून डिझाइन केलेले आहे.

महिलांसाठी सरकारी कल्याणकारी योजनांमध्ये नागरिकांचा सहभाग वाढवण्याच्या उद्देशाने नारी शक्ती दूत अ‍ॅप विकसित करण्यात आले आहे. अनेक पात्र आणि गरजू व्यक्तींपर्यंत अनेकदा सरकारी योजनांची माहिती पोहतच नाही. त्यांच्याकडे त्यांना मिळणाऱ्या सोयींचा लाभ घेण्याच बऱ्याच जणांना अडचणींचा समाना करावा लागतो हे ओळखून, हे अ‍ॅप सरकार, नागरिक आणि लाभार्थी यांच्यातील एक महत्त्वाचा दुवा म्हणून काम करते. तंत्रज्ञानाचा वापर करून, अ‍ॅप गरजू व्यक्तींची ओळख आणि मदत मिळणे सुलभ करते. यामुळे सरकारी कार्यक्रमांची कुठल्याही अडचणींशिवाय अंमलबजावणी करणे सोपे जाणार आहे.

'नारी शक्ती दूत अ‍ॅप' हे महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या संकल्पनेतून पुढे आले आहे. त्यांनी त्यांच्या विभागाच्या अधिकार्‍यांना या मोबाईल अ‍ॅप्लिकेशनवर काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत, ज्यामुळे महिलांसाठी कल्याणकारी योजनांना चालना देण्यासाठी नागरिकांचा सहभाग तर सुलभ होतोच सोबतच महिलांना इतर विभागांच्या योजनांचा लाभ मिळण्यासही मदत होते. महाराष्ट्रासाठी नमो महिला सहशक्तीकरण अभियानांतर्गत पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते हे अ‍ॅप लाँच करण्यात आले.

नारी शक्ती दूत अ‍ॅपचा इंटरफेस हा युजर फ्रेंडली बनवण्यात आला आहे, जेणेकरून हे अ‍ॅप सर्व स्तरातील आणि वयोगटातील व्यक्तींना वापरता येणार आहे. सध्या हे अ‍ॅप प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे.

नागरिक, बचत गट या अ‍ॅपचा वापर करून त्यांच्या परिसरातील सरकारी योजनांचा लाभ घेऊ शकतात पण त्यांना याबद्दल माहिती नाही अशा महिलांची ओळख पटवू शकतात. या अ‍ॅपममध्ये विविध सरकारी योजना, त्यांच्या पात्रतेचे निकष आणि ते देत असलेल्या लाभांबद्दल माहिती देण्यात आली आहे. तसेच गरजू महिलांना प्रभावीपणे मार्गदर्शन करण्यासाठी नागरिकांना सक्षम करते.

जिल्हाधिकारी कार्यालयांना नारी शक्ती पोर्टलवर एक्सेस असेल ज्यामध्ये ते नागरिकांनी मदत केलेल्या गरजू महिलांची माहिती पाहू शकतात, संपर्क साधू शकतात आणि त्यांना मदत पुरवण्यासाठी काम करू करू शकतात. वापरकर्ते त्यांच्या संबंधीत प्रकरणांची प्रोग्रेस ट्रॅक करु शकतात. तसेच कामातील पारदर्शकता आणि प्रोग्रेस देखील तपासली जाऊ शकते.

अ‍ॅपच्या प्रक्रिकेतील पाच महत्वाचे टप्पे

1) नागरिकांकडून लाभार्थ्यांची ओळख करून त्यांची माहिती नारी शक्ती दूत अॅपद्वारे

सादर केली जाते.

2) ही माहिती जिल्हा जनकल्याण कक्षाला दिली जाते.

3) जिल्हा जनकल्याण कक्ष लाभार्थ्यांशी त्यांच्या गरजा समजून घेण्यासाठी संपर्क साधतो.

4) पात्रता तपासणे आणि त्यांना लाभ मिळविण्यासाठी कागदपत्रांची पूर्तता करण्यास मदत केली जाते.

5) नारी शक्ती दूतांना मिळालल्या लाभाबद्दल माहिती मिळते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT