Poco C65 price eSakal
विज्ञान-तंत्र

Poco C65 : पोकोने लाँच केला 10 हजारांपेक्षा स्वस्त फोन; फीचर्स असे की महागडे फोनही यापुढे फिके!

Poco Smartphone Under 10K : पोकोच्या या स्मार्टफोनच्या बेस व्हेरियंटची किंमत 8,499 रुपये असणार आहे.

Sudesh

Poco C65 Budget Smartphone : पोकोने भारतात आपला एक अगदी स्वस्त फोन लाँच केला आहे. Poco C65 असं या फोनचं नाव आहे. या फोनमध्ये 50 मेगापिक्सल कॅमेरा, 256GB रॅम असे तगडे फीचर्स देण्यात आले आहे. दहा हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या सेगमेंटमध्ये हा फोन लाँच करण्यात आला आहे.

Poco C65 चे तीन स्टोरेज व्हेरियंट लाँच करण्यात आले आहेत. यातील बेस व्हेरियंटमध्ये 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज देण्यात येत आहे. या व्हेरियंटची किंमत 8,499 रुपये असणार आहे. पुढील व्हेरियंट हे 6GB+128GB असं कॉम्बिनेशन मिळतं. याची किंमत 9,499 रुपये आहे. तर 8GB+256GB व्हेरियंटची किंमत ही 10,999 रुपये असणार आहे.

फीचर्स

या फोनमध्ये 6.74 इंच HD+ LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. याचा रिफ्रेश रेट 90Hz आहे, तर टच सॅम्पलिंग रेट 180Hz आहे. C65 फोनमध्ये मीडियाटेक हेलिओ G85 SoC प्रोसेसर देण्यात आला आहे. तसंच यामध्ये अँड्रॉईड 13 आधारित MIUI 14 ही ओएस असणार आहे.

या फोनमध्ये मागच्या बाजूला ट्रिपल रेअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यातील प्रायमरी कॅमेरा हा 50MP क्षमतेचा आहे. सोबतच एक 2MP मॅक्रो कॅमेरा आणि एक डेप्थ सेन्सर कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फीसाठी पुढच्या बाजूला 8MP कॅमेरा देण्यात आला आहे.

हा एक 4G फोन असणार आहे. यामध्ये ब्लूटूथ 5.3, GPS, 3.5mm ऑडिओ जॅक, अँबियंट लाईट सेन्सर, एक्सेलेरोमीटर, ई-कम्पास आणि व्हर्चुअल प्रॉक्सिमिटी सेन्सर असे फीचर्स यामध्ये देण्यात आले आहेत. Poco C65 या फोनमध्ये 5000 mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

ऑफर्स

हा फोन मॅट ब्लॅक आणि पेस्टल ब्लू या दोन रंगांमध्ये उपलब्ध करण्यात आलेला आहे. फ्लिपकार्टवरुन याची खरेदी करता येणार आहे. याठिकाणी ICICI बँक क्रेडिट आणि डेबिट कार्डवर 1,000 रुपयांचा डिस्काउंट मिळणार आहे. सोबतच EMI पर्यायही उपलब्ध असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray : महाविकास आघाडी जिंकली नाही तर गुजरात जिंकेल; आदित्य ठाकरेंचा घणाघात

Curry Leaves Health Benefits: औषधी गुणधर्म असलेला कढीपत्ता 'या' गंभीर आजारांना ठेवतो दूर

Manipur Voilance : मुख्यमंत्री बिरेनसिंह यांचे पेटविले घर; मैतेई गटाकडून २४ तासांचा अल्टिमेटम

Kantara Chapter 1: तारीख ठरली! 'या' दिवशी जगभरात प्रदर्शित होणार 'कांतारा चॅप्टर १'; उरले किती दिवस?

Latest Maharashtra News Updates : मनसे पदाधिकाऱ्यांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT