नवी दिल्ली : सोमवारी रात्री तब्बल सहा तासांसाठी फेसबुक कंपनीच्या अखत्यारित येणारे अॅप्स बंद पडले होते. सर्व्हर डाऊन झाल्याकारणाने फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हाट्सअॅप हे लोकप्रिय अॅप्स वापरण्यामध्ये युझर्सना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला होता. त्यामुळे गैरसोयीला सामोरे जाणाऱ्या युझर्सनी ट्विटरवर जाऊन आपल्या तक्रारी मांडण्यास सुरुवात केली. काही क्षणातच ट्विटरवर फेसबुक डाऊन असा हॅशटॅग ट्रेंड होऊ लागला. अगदी काल रात्री देखील बारा वाजल्यानंतर फेसबुक आणि इन्स्टाग्राम वापरण्यामध्ये तशाच अडचणी आल्याचं दिसून आलं. ही झाली नाण्याची एक बाजू!
काय आहे नाण्याची दुसरी बाजू?
याच नाण्याची दुसरी बाजू आता समोर आली आहे. पॉर्नहब या लोकप्रिय पॉर्नोग्राफी साईटने असा दावा केलाय की, त्या रात्री त्यांच्या साईटवर येणाऱ्या ट्राफीकमध्ये तब्बल 10.5 टक्क्यांची वाढ झालेली पहायला मिळाली आहे. याची आलेखात्मक आकडेवारी देखील पॉर्नहबने शेअर केली आहे. जेंव्हा फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हाट्सअॅप बंद होतं तेंव्हा त्या रात्री लोक काय करत होते, याचं उत्तरच एकप्रकारे पॉर्नहबने दिलंय. मध्यरात्री एकच्या आसपास पॉर्नहबवर जोरदार ट्राफीक पहायला मिळालं.
थोडक्यात, फेसबुकसारख्या एका मोठ्या टेक कंपनीच्या आऊटेजमुळे लोकांनी पोर्नोग्राफी वेबसाइटवर गर्दी केल्याचं दिसून आलं. फेसबुकची सेवा बाधित झाल्यानंतर पॉर्नहबला प्रति तास सुमारे अर्धा दशलक्ष इतके अतिरिक्त युझर्स मिळाल्याचं आकडेवारी सांगते. मात्र, हे लक्षात असुद्या की, भारतामध्ये पॉर्नोग्राफी वेबसाइट आणि पॉर्न होस्ट करणाऱ्या सर्व पोर्टल्सवर भारतात बंदी आहे. तरीही खाजगीरित्या पॉर्न पाहणे मात्र बेकायदेशीर नाहीये.
फेसबुक डाऊनचं काय होतं कारण?
मार्क झुकेरबर्गने या प्रकाराबद्दल युजर्सची वैयक्तिक माफी मागितली आहे. काही लोकांना फेसबुक अॅप वापरण्यास अडचणी आल्या. आम्ही ते पुन्हा पुर्ववत करण्याचा प्रयत्न करत होतो. पण यामागचं कारण समजू शकलं नाही असं सांगण्यात आलं आहे. इन्स्टाग्रामच्या अदम मोस्सेरी यांनी स्नो डे असल्यासारखं वाटतंय असं म्हटलं होतं. तर फेसबुकचे मुख्य टेक्नॉलॉजी ऑफिसर माइक स्क्रॉफर यांनी नेटवर्किंगमध्ये प्रॉब्लेममुळे असं झाल्याचं म्हटलं आहे.
रॉयटर्स वृत्तसंस्थेला नाव न सांगण्याच्या अटीवर काही फेसबुक कर्मचाऱ्यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी म्हटलं की, इंटर्नल राउटिंगमधील चुकीमुळे हे झालं होतं. काही सुरक्षा तज्ज्ञांच्या मते फेसबुक, व्हॉटसअॅप आणि इन्स्टाग्राम त्यांच्या अंतर्गत चुकीमुळे तसंच त्यांच्याच सिस्टिममुळे झालं असल्याची शक्यता आहे. फेसबुकचे माजी सिक्युरिटी ऑफिसर अॅलेक्स स्टॅमोस यांनी म्हटलं की,'सर्व्हरवर लोड आल्यानं किंवा चुकीचा कोड नेटवर्क मॅनेजमेंट सिस्टिममध्ये पुश झाल्यानं असं झाल्याची शक्यता आहे.' काही इंटरनेट तज्ज्ञांच्या मते फेसबुकच्या राऊटर्समध्ये गडबड झाली असावी. जे राऊटर्स फेसबुक नेटवर्कला इंटरनेटशी जोडतात त्यातील समस्येमुळे असा प्रकार घडला असावा असं क्लाउडफ्लेअरच्या जॉन ग्राहम कमिंग यांनी म्हटलं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.