how to check ppf account balance online esakal
विज्ञान-तंत्र

PPF Balance Checking Tricks: PPF अकाऊंटवरील बॅलन्स ऑनलाईन कसा चेक करायचा?

तुम्ही तुमचे PPF खाते सतत चालू ठेवले तर तुमच्या निवृत्तीनंतर चांगला फायदा मिळेल

Pooja Karande-Kadam

PPF Balance Checking Tricks : नोकरदार लोकांसाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी PPF खूप महत्त्वाचा आहे. अनेकदा लोक नोकरी बदलल्याबरोबर ही बचत काढून घेतात. पण, हे असे करू नये. जर तुम्ही तुमचे PPF खाते सतत चालू ठेवले तर तुमच्या निवृत्तीनंतर चांगला फायदा मिळेल.

तुमचे PPF चे पैसे तुमच्या खात्यात सतत जमा होत आहेत की नाही.याकडेही तुम्ही काळजीपुर्वक पाहणे गरजेचे आहे. तुमच्या खात्यावर किती पीएफ शिल्लक आहे, हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला वर्षाअखेरी दिले जाणाऱ्या स्टेटमेंटची वाट पाहण्याची गरज नाही.

तुम्ही स्वत:च तुमच्या अकाऊंटवर किती बॅलन्स आहे? यासाठी तुम्हाला कुठे बाहेर जायची गरज नाहीय. तुम्ही घरबसल्या बॅलन्स चेक करू शकता. घरबसल्या चार प्रकारे PPF वरील बॅलन्स पाहता येतो. तो कसा पहायचा हे पाहुयात.

पीएफ बॅलन्स चेक करण्याचे चार प्रकार

EPFO वेबसाईट वरुन

एसएमएसच्या माध्यमातून

मिस कॉल देऊन

UMANG App वरुन

वेबसाईट

  • EPFO च्या https://www.epfindia.gov.in या  वेबसाईटवर लॉग इन करा.  ई-पासबुक वर क्लिक करा

  • ई-पासबुक वर क्लिक केल्यावर https://passbook.epfindia.gov.in/MemberPassBook/Login या नवीन पेजवर याल.

  • तिथं आपला UAN नंबर आणि पासवर्ड तसेत कॅप्चा भरा

  • सर्व डिटेल्स भरल्यावर एक नवं पेज ओपन होईल. तिथं मेंबर आयडी सिलेक्ट करा.

  • तिथं ई-पासबुकच्या माध्यमातून आपला ईपीएफ बॅलन्स पाहू शकाल

SMS च्या माध्यमातून

  • आपण एसएमएसच्या माध्यमातून देखील पीएफ खात्यातील बॅलन्स चेक करु शकतो.

  • यासाठी आपला मोबाईल नंबर  EPFO सोबत रजिस्टर्ड असणं आवश्यक आहे. 

  • रजिस्टर्ड  मोबाइल नंबरवरुन EPFOHO UAN लिहून 7738299899 वर एसएमएस करावं लागेल.

  • आपल्याला बॅलन्स संबंधी डिटेल्स हिंदीसह अन्य भाषांमध्ये मिळतील. आपल्याला ज्या भाषेत माहिती हवी आहे त्या भाषेचा कोड द्यावा लागेल. 

मिस कॉलच्या माध्यमातून

- पीएफ अकाऊंटशी जो नंबर लिंक केला आहे त्या रजिस्टर नंबर वरुन 011-22901406 या नंबरवर मिस-कॉल द्या

- मिस-कॉल दिल्यानंतर लगेच आपल्य़ा रजिस्टर नंबरवर मॅसेज येईल यात  PF Balance ची माहिती मिळेल.

UMANG App च्या माध्यमातून

  • आपल्या स्मार्टफोनमध्ये प्ले स्टोअरवरुन Umang App डाऊनलोड करा

  • आपला फोन नंबर रजिस्टर करा आणि अॅपमध्ये लॉगिन करा

  • टॉप वर डाव्या बाजूला दिलेल्या मेन्यू ऑप्शनमध्ये जाऊन ‘Service Directory’ मध्ये जा

  • तिथं EPFO हा पर्याय दिला असेल, त्यावर क्लिक करा

  • तिथं View Passbook मध्ये गेल्यानंतर आपला UAN नंबर आणि OTP टाकून बॅलन्स पाहता येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात विजयी मिरवणूक काढण्यास सक्त मनाई; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अमित ठाकरेच आमदार होणार; मनसेला विश्वास

Maharashtra Assemble Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT