Modi Meets Gamers eSakal
विज्ञान-तंत्र

PM Modi Meets Gamers : पंतप्रधान मोदींनी घेतली भारतातील टॉप गेमर्सची भेट, स्वतःही खेळल्या गेम्स; पाहा व्हिडिओ

एएनआयने या भेटीचा व्हिडिओ आज प्रसिद्ध केला. यामध्ये दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदींनी स्वतः देखील काही गेम्स खेळून पाहिल्या.

Sudesh

PM Modi Gamers Meet : पंतप्रधान मोदींनी बुधवारी भारतातील टॉप गेमर्सची भेट घेतली. देशातील गेमिंग कम्युनिटीसाठी ही भेट अगदी महत्त्वाची आहेच. मात्र भारतातील गेमिंग कल्चर, ई-स्पोर्ट्स यांची वाढ आणि त्याचा अर्थव्यवस्थेवर पडणारा प्रभाव या सगळ्या चर्चेमुळे देखील ही भेट अगदी महत्त्वपूर्ण मानली जात आहे. पंतप्रधान मोदींना भेटलेल्या गेमर्समध्ये ई-स्पोर्ट्स चॅम्पियन आणि कंटेंट क्रिएटर्सचा समावेश आहे.

एएनआयने या भेटीचा व्हिडिओ आज प्रसिद्ध केला. यामध्ये दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदींनी स्वतः देखील काही गेम्स खेळून पाहिल्या. (Online Gaming)

कोणत्या गेमर्सचा समावेश?

पंतप्रधान मोदींना भेटलेल्या गेमर्समध्ये नमन माथुर (Naman Mortal Mathur), अनिमेश अग्रवाल (Animesh Thug Agarwal), पायल धारे (Payal Dhare), तीर्थ मेहता, मिथिलेश पाटणकर (MythPat), गणेश गंगाधर (SkRossi) आणि अंशू बिश्त (GamerFleet) यांचा समावेश होता. हे सगळे आपापल्या गेमिंग फील्डमध्ये टॉप पोझिशनला आहेत.

गप्पा मस्करी अन् गेमिंग

पंतप्रधान मोदींनी या गेमर्ससोबत अगदी हलक्या-फुलक्या गप्पा मारल्या. यावेळी चेष्टा-मस्करी देखील चालली होती. एएनआयच्या व्हिडिओमध्ये दिसतंय की पंतप्रधान मोदी या गेमर्सना म्हणतात 'मी केस कलर करुन पांढरे करतो'. तर पंतप्रधानांना भेटून अगदीच भारावून गेलेले गेमर्सही 'मला तर अगदी धक-धक होतंय' म्हणताना दिसत आहेत.

पंतप्रधान मोदी एक व्हीआर गेम खेळतानाही यामध्ये दिसतंय. एका गेमरने सांगितलं, की पंतप्रधान मोदींनी अगदी लवकर ही गेम कशी खेळायची ते लक्षात घेतलं. मी माझ्या वडिलांना शिकवत असतो तेव्हा त्यांनाही हे समजायला वेळ लागतो. मात्र, पंतप्रधानांनी हे लगेच समजून घेतलं.

मी सत्तेत आल्यावरच सगळं झालं?

या चर्चेमध्ये गेमर्स म्हणतात की 2019 नंतर भारतातील गेमिंग सेक्टर जोमात चाललं आहे. सरकार गेमर्सच्या क्रिएटिव्हिटीला पाठिंबा देत आहे, आणि आता मायथॉलॉजीशी संबंधित गेम्सही वाढल्या आहेत. यावर पंतप्रधान मोदी म्हणाले, की "सगळं काही मी आल्यानंतरच झालं वाटतं.."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसे शिंदेंच्या लढतीचा आदित्य ठाकरेंचा फायदा

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: दुसऱ्या फेरी अखेर माहीममध्ये अमित ठाकरे पिछाडीवर

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT