Phone Privacy Tips esakal
विज्ञान-तंत्र

Phone Privacy Tips: स्मार्टफोनच्या प्रायवसीची आता चिंता कशाला? फोनमध्येच आहे हा ॲप; असे करा लॉक

तुमचा फोन कोणी अनलॉक केल्यास तुमच्या फोनमधील पर्सनल फोटो आणि डेटा इतरांना कळू शकतो

सकाळ ऑनलाईन टीम

Smartphone Privacy: प्रत्येकालाच्याच फोनमध्ये मोठ्या प्रमाणात पर्सनल डेटा असतो. त्यामुळे प्रत्येकालाच स्मार्टफोनची प्रायवसी हवी असते. तुमचा फोन कोणी अनलॉक केल्यास तुमच्या फोनमधील पर्सनल फोटो आणि डेटा इतरांना कळू शकतो. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी आज आपण तुमच्याच फोनमध्ये असलेल्या ॲप लॉकबाबत जाणून घेऊयात. ज्याबद्दल अनेकांना माहिती नसते.

गूगल प्ले स्टोअरवर अनेक ॲप लॉक उपलब्ध असतात. पण त्याने सेक्युरीटीला धोकाही होऊ शकतो. त्यामुळे स्मार्टफोन कंपन्या आजकाल आधीच प्री इंस्टॉल ॲप लॉकची सुविधा ग्राहकांना मोबाईलमध्येच देतात.

ॲपला असे करा लॉक

अँड्रॉइड फोन आजकाल इनबिल्ड ॲपला लॉक करण्याची सुविधा देतेय. ॲपला लॉक करण्यासाठी आधी तुम्हाला फोनच्या सेटिंगमध्ये जावे लागेल.

तेथे प्रायवसी फिचरवर टॅप करा.

येथे तुम्हाला व्हेरिफाय विथ फिंगरप्रिंट किंवा फेस असे विचारले जाईल.

दोनपैकी कुठल्याही ऑप्शनवर क्लिक करून अनलॉक करा.

आता ॲप लॉक इनेबल करा. (Smartphone Tips)

इनेबल करताच तुमच्या फोन स्क्रिनवर असलेले सगळी ॲप लिस्ट ओपन होईल.

जेव्हाही तुम्हाला ॲप लॉक करायचं असेल तेव्हा त्यावर क्लिक करा तुमचे ॲप लॉक होऊन जाईल.

जर तुम्ही ॲपला अनलॉक करण्यासाठी जर फिंगरप्रिंटचा किंवा फेस आयडीचा वापर करत नसाल तर अनलॉकसाठी फोनच्या पासवर्डऐवजी दुसरा पासवर्ड टाका.

कारण दोन्ही पासवर्ड सेम असल्यास तुमचा फोन कोणीही ओपन करू शकेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: महायुतीला जिंकवणाऱ्या लाडक्या बहिणीचा हप्ता कधी येणार? आता १५०० नाही तर....

Election Results 2024: खरी राष्ट्रवादी कुणाची आज महाराष्ट्र ठरवणार! आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार कोण आघाडीवर?

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: सुनील शेळके १ लाख २ हजार ९६७ मतांनी आघाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या अथक मेहनतीचा हा विजय

Maharashtra Election 2024: जरांगे फॅक्टर फेल! महाराष्ट्रात महायुतीनं मारली मुसंडी, भाजप रेकॉर्डब्रेक आघाडी

SCROLL FOR NEXT