इस्राइल-हमास युद्ध थांबण्याचं नाव घेत नाहीये. या युद्धाचे जगभरात आणि सर्वच क्षेत्रांमध्ये पडसाद दिसून येत आहेत. या युद्धाची धग आता गेमिंग जगतात देखील पोहोचली आहे. प्रसिद्ध गेमिंग प्लॅटफॉर्म रोबलॉक्सवर पॅलेस्टाईन समर्थनार्थ घोषणाबाजी झाल्यामुळे, इस्राइलने चिंता व्यक्त केली आहे.
Roblox या गेमिंग प्लॅटफॉर्मवर पॅलेस्टाईन समर्थक गेमर्स आपला सपोर्ट वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. रोबलॉक्स ही एक लोकप्रिय गेम असून, दररोज सुमारे 65 मिलियन गेमर्स याठिकाणी अॅक्टिव्ह असतात. यामध्ये बहुतांश अल्पवयीन मुलांचा समावेश आहे.
या गेममध्ये पॅलेस्टाईन समर्थक गेमर्स पॅलेस्टाईन आणि सौदी अरेबियाचे ध्वज घेऊन फिरताना दिसत आहेत. एवढंच नाही, तर हे प्लेयर्स इस्राइलच्या खेळाडूंना शोधू-शोधून त्यांच्यावर हल्ले करत आहेत.
इस्राइलच्या संरक्षण मंत्रालयाने याबाबत अलर्ट जारी केला आहे. "जर तुमच्या मुलांवर देखील गेममध्ये अशा प्रकारे टार्गेट केलं जात असेल, तर मंत्रालयाला याबाबत माहिती द्या", असं इस्राइल सरकारने पालकांना म्हटलं आहे.
गेममध्ये होत असलेल्या व्हर्चुअल रॅलीमध्ये मलेशियाच्या गेमर्सची संख्या सर्वाधिक असल्याचं सांगण्यात येत आहे. या गेम कॅरेक्टर्सच्या हातात पॅलेस्टाईन आणि मलेशियाचे झेंडे दिसत होते. रोबलॉक्स गेमचे सर्व्हर बनवणाऱ्या व्यक्तीनेच या रॅलीची आयडिया समोर आणली, असंही म्हटलं जात आहे. (Gaming News)
अर्थात, कंपनीने ही गोष्टी फेटाळली आहे. कंपनीने या सर्व प्रकाराचा निषेध केला आहे. अशा प्रकारच्या घटना होऊ नये, यासाठी कंपनी प्रयत्न करत असल्याचं रोबलॉक्सने स्पष्ट केलं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.