नवी दिल्ली- भविष्यात आपल्या सर्व नोकऱ्या कृत्रिम बुद्धीमत्ता artificial intelligence (AI) घेऊन टाकेल, आणि नोकरी करणे हे ऐच्छिक असेल असं टेस्लाचे प्रमुख इलॉन मस्क म्हणाले आहेत. मस्क हे एआय कंपनी xAI चे मालक आहेत. ते म्हणाले की, 'ही काही चुकीची गोष्ट नाही. तसेच एआयच्या जगात माणसाला देखील भूमिका असेल.'
पॅरिसमधील VivaTech 2024 कार्यक्रमामध्ये मस्क एआयबद्दल बोलत होते. भविष्यात आपल्या कोणाकडेच नोकरी नसेल अशी स्थिती असू शकेल, असं देखील ते म्हणाले आहेत. नोकरी करणे ही एक आवडीची गोष्ट असेल. आवड म्हणून तुम्ही नोकरी कराल. अन्यथा, एआय आणि रोबोट तुम्हाला सर्व प्रकारच्या सेवा देऊ शकतील, असं मस्क म्हणाले.
नोकरी करण्याची गरज नसलेल्या जगामध्ये माणसांना भावनिकदृष्ट्या सक्षम वाटेल का? या प्रश्नावर देखील मस्क यांनी भाष्य केलं. कॉम्प्युटर आणि रोबोट जर तुमच्या पेक्षा चांगलं काम करत असतील, तर तुमच्या आयुष्याला काही अर्थ राहतो का? मला वाटतं अशा जगात देखील कदाचीत माणसाला काही भूमिका असेल. आपण कदाचीत एआयला एक उद्देश देऊ शकू, असं ते म्हणाले.
एआयच्या जगात वस्तू आणि सेवांची काहीच कमी नसेल. नोकरी नसेल पण सरकारला प्रत्येकाही काही रक्कम द्यावी लागेल. जसं एआयची क्षमता वाढत जाईल, तसे ग्राहक नवीन तंत्रज्ञान आत्मसात करतील. कंपन्या आणि नियामक नव्या तंत्रज्ञानाचा योग्यपणे कसा वापर करायचा याबाबत अभ्यास करतील, असं मस्क म्हणाले आहेत.
एआयच्या सगळ्यांच्या आयुष्यातील सहभाग वाढत आहे. एआय सगळ्यांच्या नोकऱ्या खाईल अशी भीती अनेकांना वाटू लागली आहे. पण, नोकरीच्या संदर्भात तज्ज्ञांची वेगवेगळी मतं आहेत. ओपनएआयचे सीईओ सॅम अल्टमन यांचं म्हणणं आहे की, 'एआय काही नोकरी घेईल हे नक्की आहे. पण, तो वेगळ्या पद्धतीच्या नोकऱ्या निर्माण देखील करेल.'
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.