मारुती सुझुकी (Maruti Suzuki)फेब्रुवारीमध्ये त्यांची नवीन कार 2022 बलेनो (Baleno) लॉन्च करणार आहे. लेटेस्ट अपडेट नुसार कंपनीने गुजरातमध्ये नवीन बॅलेनो हॅचबॅकचे उत्पाद न सुरू केले आहे आणि ते काही दिवसात डीलरशिपपर्यंत पोहोचेल. 24 जानेवारी रोजी, नवीन बलेनोची पहिली बॅच गुजरात प्लांटमधून रोलआउट देखील झाली आहे, जे काही दिवसांमध्ये डीलरशिपपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.
2022 मारुती बलेनोचे फोटो या आधीच इंटरनेटवर लीक झाले आहेत. NEXA डीलरशिप रेंजच्या माध्यमातून विकल्या जाणार्या, नवीन बलेनोच्या समोरच्या डिझाइनमध्ये बदल पाहायला मिळतील. या हॅचबॅकचे बॉडी पॅनल्स रीडीझाइन केले गेले आहेत ज्यामुळे ती सध्याच्या कारपेक्षा अधिक बोल्ड दिसते.
फीचर्स
2022 Baleno च्या इंटीरियरमध्येही बदल दिसून येतील. यात कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी, नवीन डॅशबोर्ड, वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कार प्ले यांसारख्या फीचर्स देण्यात येतीलल. सध्याच्या बलेनोला 7-इंचाऐवजी मोठी टचस्क्रीन (अंदाजे 8-इंच) मिळेल. नवीन बलेनोमध्ये हेड-अप डिस्प्ले किंवा HUD असू शकतो. नवीन टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टमच्या वेगवेगळ्या आवृत्त्या असतील. याशिवाय यामध्ये अनेक कनेक्टेड फीचर्सही पाहता येतील.
सध्याचे Baleno इंजिन
मारुती बलेनोमध्ये 1.2L पेट्रोल आणि 1.3L मल्टीजेट डिझेल इंजिन आहे. या प्रीमियम हॅचबॅकमध्ये 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स स्टँडर्ड देण्यात आला आहे. तर CVT फक्त पेट्रोल इंजिनमध्ये दिले जाते. इंजिन कार्यक्षमतेबद्दल बोलायचे झाल्यास, 1.2-लीटर के-सीरीज पेट्रोल इंजिन 6,000rpm वर 83bhp आणि 4,000rpm वर 115Nm टॉर्क जनरेट करते. तर 1.3-लिटर DDiS इंजिन 4,000rpm वर 74bhp आणि 2,000rpm वर 190Nm टॉर्क जनरेट करते.
किंमत किती असेल?
एंट्री-लेव्हल सिग्मा व्हेरिएंटचे पेट्रोल व्हर्जन 6.14 लाख रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होते. तुम्ही ते 9957 रुपयांचा मासिक EMI भरून खरेदी करू शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.