pslv c56 ds sar isro launch seven satellites singapore sriharikota all about india space mission Sakal
विज्ञान-तंत्र

ISRO : श्रीहरिकोटाहून रविवारी सात उपग्रहांचे प्रक्षेपण; सिंगापूरच्या उपग्रहाचाही समावेश

‘पीएसएलव्ही-सी ५६’ या प्रक्षेपकाच्या मदतीने या उपग्रहांचे उड्डाण पहिल्या प्रक्षेपक तळावरून ३० रोजी सकाळी साडेसहाला होणार

सकाळ वृत्तसेवा

बंगळूर : सिंगापूरच्या ‘डीएस -एसएआर’ उपग्रहासह इतर सात उपग्रहांचे प्रक्षेपण भारतीय अवकाश संशोधन संस्था (‘इस्रो’) श्रीहरिकोटा येथील अवकाश केंद्रावरून रविवारी (ता. ३०) करणार आहे.

‘पीएसएलव्ही-सी ५६’ या प्रक्षेपकाच्या मदतीने या उपग्रहांचे उड्डाण पहिल्या प्रक्षेपक तळावरून ३० रोजी सकाळी साडेसहाला होणार आहे, अशी माहिती ‘इस्रो’ने दिली. सिंगापूर सरकारच्या ‘डिफेन्स सायन्स अँड टेक्नॉलॉजी एजन्सी’ (डीएसटीए) आणि तेथीलच ‘एसटी इंजिनिअरिंग’ यांच्या भागीदारीतून ‘डीएस -एसएआर’ उपग्रह विकसित केला आहे.

हा उपग्रह कार्यान्वित झाल्यानंतर सिंगापूर सरकारमधील विविध संस्थांच्या उपग्रह प्रतिमांना आवश्‍यक सहाय्य देण्यासाठी त्याचा वापर केला जाईल. ‘एसटी इंजिनिअरिंग’ त्यांच्या व्यावसायिक ग्राहकांसाठी विविध पद्धतींच्या वापराने उच्च गुणवत्तेची छायाचित्रे काढणे आणि भौगोलिक सेवा देण्यासाठी या उपग्रहाचा वापर करणार आहे.

‘इस्राईल एरोस्पेस इंडस्ट्रीजने (आयएआय) विकसित केलेले सिंथेटिक अपार्चर रडार (एसएआर) उपकरण ‘डीएस-एसएआर’मध्ये आहे. त्याच्या मदतीने हा उपग्रह दिवस-रात्रीचे हवामानाचा मागोवा घेईल आणि प्रकाशाच्या संपूर्ण ध्रुवीकरण मोजण्याच्या साधनाने एक मीटर रेझोल्युशनचे छायाचित्र काढण्यास सक्षम असेल.

अवकाश मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या ‘द न्यूस्पेस इंडिया लिमिटेड’ या केंद्रातील सार्वजनिक उपक्रमाने ‘पीएसएलव्ही - सी५६’ प्रक्षेपक खरेदी केला आहे. याद्वारे ३६० किलो ‘डीएस-एसएआर’ उपग्रह अवकाशात सोडण्यात येणार आहे. अशी माहिती ‘इस्रो’ने सोमवारी ट्विट करून दिली.

अन्य सहा उपग्रह

व्हेलॉक्स-एएम (तंत्रज्ञानदर्शक २३ किलोचा सूक्ष्म उपग्रह), ‘ॲटमॉस्फेरिक कपलिंग अँड डायनामिक्स एक्स्प्लोरर (प्रायोगिक उपग्रह), ‘स्कूब-२ (३यू नॅनोउपग्रह), ‘नूलियन’ (शहरी आणि दुर्गम ठिकाणी अखंड ‘आयओटी’ कनेक्शन पुरविणारा ३ यू नॅनो उपग्रह), ‘क्लासिया-२’ आणि ‘ओआरबी-१२ स्ट्रायडर’ (आंतरराष्ट्रीय सहकार्याने निर्मिती).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bandra Kurla Complex Metro Station वर आग, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल, प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण

RBI: शक्तीकांता दास RBIचे गव्हर्नर राहणार की राजीनामा देणार? त्याचा तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?

Sharad Pawar : देवेंद्र फडणवीस यांच्या 'त्या' दाव्यावर शरद पवारांचा पलटवार, म्हणाले- त्यांनी माझं स्थान ओळखलं पाहिजे

Maharashtra Vidhansabha: ठाकरे, काँग्रेस, भाजप, पवार नाही तर 'हा' पक्ष लढवणार महाराष्ट्रात सर्वाधिक जागा!

Washim Assembly Election 2024 : युती-आघाडीला बंडखोरांचे आव्हान, वाशीम विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढतीचे चित्र

SCROLL FOR NEXT