Online Trading Scam Hits Pune Family for Rs 2.45 Crore esakal
विज्ञान-तंत्र

Pune Trading Scam : व्हाट्सअप ग्रुपला ऍड झाले अन्..कोट्यवधी रुपये गमावले

Pune Whatsapp Scam: पुण्यात ऑनलाइन शेअर ट्रेडिंग स्कॅम ; दोन भावांसोबत झाला फ्रॉड

सकाळ डिजिटल टीम

Pune: सायबर फ्रॉडच्या अनेक घटनांबद्दल आपण सतत ऐकत असतो. नुकतीच अशी ओंलीने फसवणुकीची घटना पुण्यात घडली आहे. ज्यामध्ये दोन भावांना व्हाट्सअप मुळे तब्बल २ कोटीपेक्षा जास्त रुपये गमवावे लागलेत.

पुण्यात घडलेल्या ऑनलाइन शेअर ट्रेडिंग घोटाळ्यामुळे गुंतवणदारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ५३ वर्षीय एका पुणेकर व्यक्ती आणि त्याच्या भाऊची ऑनलाइन ट्रेडिंगच्या नावावर तब्बल २.४५ कोटी रुपये फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

दीघी पोलीस स्टेशनमध्ये नोंद झालेल्या तक्रारीनुसार, फसवणूक झालेल्या व्यक्तीला व्हाट्सअप ग्रुपवर ऍड करण्यात आले आणि मोबदला नफा दाखवून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करण्यात आले. नंतर याच फसव्या ग्रुपमध्ये त्याच्या भावालाही ऍड करण्यात आले.

फसवणुकीच्या जाळ्यात अडकलेल्या व्यक्तीने गुन्हेगारांच्या सूचनांनुसार, शेअर ट्रेडिंगसाठी खाते उघडले आणि त्या ग्रुपमधून मिळालेल्या सूचनांवरून दोघांनीही 'शेअर्स' खरेदी करायला सुरुवात केली.

या प्रक्रियेत गुंतवणूकदार व्यक्तीने ₹१,६७,८०,००० आणि त्याच्या भाऊने ₹७७,५०,००० इतकी रक्कम वेगवेगळ्या बँक खात्यांवर ट्रांसफर केली, असा समज होता की हे पैसे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक म्हणून जात आहेत.

“काही दिवसांनी त्यांना बनावट नफा दाखवून त्यांनी शेअर ट्रेडिंगमध्ये ₹८ कोटी कमावले असल्याचे सांगण्यात आले. मात्र, मार्च महिन्यात पैसे परत घेण्यासाठी संबंधित व्यक्तीने प्रयत्न केला असता, गुन्हेगारांनी SEBI आणि इतर संस्थांनी त्यांचे खाते लॉक केल्याचे आणि ते चौकशीअंतर्गत असल्याचे सांगून पैसे परत देण्यास टाळाटाळ केली,” अशी माहिती पोलीसांनी दिली.

अश्या फसव्या लिंक आणि वेबसाइट्स पासून सावध राहणे गरजेचे आहे. तसेच लोकांनी अश्या संशयास्पद लोकांची व्हाट्सअप ग्रुपची तक्रार सायबर सेलकडे करावी असे आवाहन केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT