Digital QR Code Mehendi 
विज्ञान-तंत्र

Digital Mehendi : चक्क मेहंदीमध्ये काढला 'QR कोड'! रक्षाबंधनाचं गिफ्ट घेण्यासाठी बहिणीची शक्कल, व्हिडिओ व्हायरल

Raksha Bandhan 2023 : सध्या बहिणीला ओवाळणी म्हणून देणारी भेटवस्तू किंवा पैसे देखील डिजिटल पद्धतीने देण्यात येत आहे.

Sudesh

रक्षाबंधन हा सण बहिण-भावाच्या गोड नात्याचा. बहीण भावाला ओवाळून राखी बांधते, आणि भावाच्या भरभराटीची प्रार्थना करते. तर, भाऊ बहिणीची रक्षा करण्याचं वचन देतो, आणि सोबतच बहिणीला ओवाळणी म्हणून भेटही देतो.

सध्याचं जग हे डिजिटल आहे. यामुळेच ओवाळणी म्हणून देणारी भेटवस्तू किंवा पैसे देखील डिजिटल पद्धतीने देण्यात येत आहे. काही भाऊ आपल्या बहिणीला ऑनलाईन गिफ्ट मागवतात, किंवा मग मोबाईल स्कॅनरच्या मदतीने तिला पैसे देतात. मात्र, एका बहिणीने गिफ्ट घेण्यासाठी वेगळीच शक्कल लढवली आहे.

क्यूआर कोड

आपल्याला माहिती आहे, की यूपीआय पेमेंट करण्यासाठी आपल्याला एक QR कोड स्कॅन करावा लागतो. एका मुलीने हेच लक्षात घेऊन, चक्क आपल्या मेहंदीमध्येच क्यूआर कोडचं डिझाईन करून घेतलं आहे. त्यामुळेच, यूपीआय अ‍ॅपमधून ही मेहंदी स्कॅन केल्यास, थेट तिच्या अकाउंटमध्ये पैसे पाठवण्याची सोय झाली आहे.

सोशल मीडियावर ही ट्रिक मोठ्या प्रमाणात व्हायरल होते आहे. या व्हिडिओला 2.3 मिलिनयहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर सुमारे 21 हजार एक्स (ट्विटर) यूजर्सनी याला लाईक केलं आहे. यावर लोक विविध प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत.

लोकांच्या प्रतिक्रिया

काही यूजर्सनी या व्हिडिओच्या सत्यतेवर शंका व्यक्त केली आहे. हा व्हिडिओ फेक असल्याचं काहींचं म्हणणं आहे. मात्र बाकी यूजर्स या व्हिडिओचं कौतुक करताना दिसत आहेत. फेक असो वा खरं, ही आयडिया खरंच भारी आहे, असं एका यूजरने म्हटलं आहे. तर, 'डिजिटल इंडिया' मोहिमेमुळे काय काय पहावं लागणार आहे, असंही दुसऱ्या एका यूजरने म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhokardan Assembly constituency 2024 : महाविकास आघाडीचे उमेदवार 'चंद्रकांत दानवे' यांच्या गाडीवर दगडफेक

Gold Silver Rate: सोन्याचे भाव सलग सहाव्या दिवशी घसरले; आज सोने 1,300 रुपयांनी स्वस्त, काय आहे भाव?

Stock Market: एका झटक्यात 21,000 कोटी गमावले; लोक 'या' उद्योगपतीवर संतापले, ब्रोकरेज कंपन्याही नाराज

X Account Delete : नव्या अपडेटनंतर कसं डिलिट कराल X अकाउंट? सोप्या स्टेप्स वाचा

'महाराष्ट्र ही संतांची शाहू-फुले-आंबेडकरांची भूमी, भाजपकडून पुरोगामी महाराष्ट्राला बदलण्याचा प्रयत्न'; थोरातांचा निशाणा

SCROLL FOR NEXT