Operation Amanat eSakal
विज्ञान-तंत्र

Operation Amanat : ट्रेनमध्येच विसरला फोन किंवा चार्जर..? छोट्या-मोठ्या गोष्टीही मिळतील परत; रेल्वेचं 'ऑपरेशन अमानत' करेल मदत

या अभियानाच्या माध्यमातून लोकांना त्यांचे विसरलेले साहित्य पुन्हा मिळवून देणे हे रेल्वेचं उद्दिष्ट आहे.

Sudesh

Railway Operation Amanat : कितीतरी वेळा ट्रेनने प्रवास करताना आपण डब्यातच काही वस्तू विसरून येतो. कधी मोबाईल चार्जर, तर कधी छोटी बॅग.. रेल्वेमध्ये अशा गोष्टी विसरल्यानंतर त्या परत मिळण्याची अपेक्षाच लोक सोडून देतात. मात्र अशा गोष्टी लोकांना परत मिळाव्यात यासाठी रेल्वेने 'ऑपरेशन अमानत' या अभियानाची सुरुवात केली आहे.

या अभियानाच्या माध्यमातून लोकांना त्यांचे विसरलेले साहित्य पुन्हा मिळवून देणे हे रेल्वेचं उद्दिष्ट आहे. तुम्ही नियमित रेल्वेने प्रवास करत असाल, तर याबाबत तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. Operation Amanat च्या माध्यमातून आपल्याला आपलं सामान कसं मिळेल? जाणून घेऊया..

काय आहे ऑपरेशन अमानत?

भारतीय रेल्वेच्या वेस्टर्न झोनपासून या अभियानाची सुरुवात करण्यात आली होती. यामुळे आतापर्यंत लाखो लोकांना त्यांचं हरवलेलं सामान परत मिळालं आहे. याच्या माध्यमातून आपलं सामान परत मिळवण्यासाठी पुढील टप्पे फॉलो करा -

  • सगळ्यात आधी तुम्हाला https://wr.indianrailways.gov.in/ या वेबसाईटला भेट द्यावी लागेल.

  • यानंतर वर असलेल्या पर्यायांमधील 'Passenger & Freight Services' यावर क्लिक करा.

  • त्यानंतर एक सब-मेन्यू उघडेल. यात सगळ्यात खाली ऑपरेशन अमानत हा पर्याय दिसेल.

  • यावर क्लिक केल्यानंतर ज्या डिव्हिजनमध्ये ही सेवा सुरू आहे, त्या डिव्हिजनची यादी तुम्हाला दिसेल.

  • यातील तुमच्या डिव्हिजनचा पर्याय निवडा. यात मुंबई सेंट्रल, वडोदरा, अहमदाबाद, रतलाम, राजकोट, भावनगर असे डिव्हिजन उपलब्ध आहेत.

  • यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला रेल्वेला सापडलेलं सामान आणि त्याची तारीख याबाबत माहिती मिळेल.

  • यामध्ये तुमचं सामान असेल, तर तुम्हाला त्याबाबत काही पुरावा सादर करावा लागेल. यानंतर हे सामान तुम्ही क्लेम करू शकाल.

  • या माध्यमातून केवळ हरवलेलं सामान मिळू शकेल. चोरी झालेल्या सामानाबाबत तुम्हाला रेल्वे पोलिसांशी संपर्क करावा लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : मविआचा विधानसभा निवडणुकीत मोठा पराभव का झाला? शरद पवार यांनी सांगितली 'ही' कारणं

Sharad Pawar: ''...म्हणून झारखंडची निवडणूक महाराष्ट्रासोबत घेतली'' शरद पवारांनी सांगितलं भाजपच्या विजयामागचं गुपित

Latest Maharashtra News Updates : नवीन मंत्रिमंडळात दिसणार नवीन चेहरे- सूत्र

IPL 2025 Mega Auction LIVE Streaming: ऋषभ, श्रेयस आणि व्यंकटेश अय्यर या लिलावातील महागडे खेळाडू! कॉनवेची चेन्नईत घरवापसी, तर वॉर्नर-पडिक्कल अनसोल्ड

Daund Assembly Election 2024 Result : दौंड विधानसभा निवडणुकीत एकाच कुटुंबात विजयाच्या दोन हॅटट्रीक; कुल पिता-पुत्रांसाठी जनादेश

SCROLL FOR NEXT