Air Force C-295 Plane eSakal
विज्ञान-तंत्र

Air Force : नजर ना लगे ! भारताला मिळाले पहिले C-295 मिलिट्री प्लेन; राजनाथ सिंहांनी रक्षणासाठी बांधला पवित्र धागा

Rajnath Singh C-295 : राजनाथ सिंह यांनी एक्स (ट्विटर) पोस्ट करत याबाबत माहिती दिली.

Sudesh

भारतीय हवाई दलाला आज C-295 मिलिट्री प्लेन मिळाले आहेत. गाझियाबादमधील हिंडन एअरफोर्स बेसवर या विमानांची पूजा पार पडली. त्यानंतर देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या विमानांची चावी हवाई दलाला सोपवली.

राजनाथ सिंह यांनी एक्स (ट्विटर) पोस्ट करत याबाबत माहिती दिली. हिंडन एअरफोर्सवर आज विविध ड्रोन कंपन्यांनी आपल्या डिव्हाईसचं प्रदर्शन केलं. या प्रदर्शनाला राजनाथ सिंह देखील उपस्थित होते. यासोबतच यावेळी C-295 विमान एअर फोर्सला सोपवण्यात आलं.

काही दिवसांपूर्वीच वायुसेना प्रमुख एअर मार्शल व्ही. आर. चौधरी यांनी स्पेनमधून हे विमान भारताच्या ताब्यात घेतलं होतं. भारतीय हवाई दलातील पायलट्सच्या पहिल्या बॅचने ही विमाने उडवण्यासाठी खास ट्रेनिंग देखील घेतले आहे. आता दुसऱ्या बॅचची ट्रेनिंग सुरू आहे.

विमानावर काढलं स्वस्तिक, बांधला धागा

राजनाथ सिंहांनी यावेळी विमानाची विधीवत पूजा केली. या विमानावर त्यांनी कुंकवाने स्वस्तिक चिन्ह काढलं. सोबतच एक पवित्र धागा देखील बांधला. यानंतर विमानाला कुंकवाचा टिळा लावत पूजा संपन्न झाली.

काय आहे खास?

हे विमान दोन पायलट मिळून उडवू शकतात. यामध्ये 73 सैनिक, किंवा 48 पॅराट्रूपर्स प्रवास करू शकतात. याऐवजी एका वेळी 12 स्ट्रेचर इंटेन्सिव्ह केअर मॅडव्हॅक किंवा 27 स्ट्रेचर मॅडव्हॅक यासोबत 4 मेडिकल अटेंडंट नेता येऊ शकतात. हे विमान 9,250 किलो वजन वाहून नेऊ शकतं.

विमानाचं वैशिष्ट्य

या विमानांचं वैशिष्ट्य म्हणजे याच्या उड्डाणासाठी मोठ्या रनवेची गरज भासत नाही. टेकऑफ करण्यासाठी केवळ 934 मीटर रनवे पुरेसा आहे, तर लँडिंग करण्यासाठी याच्या सुमारे निम्मा म्हणजेच 420 मीटर रनवे पुरेसा आहे. त्यामुळे प्रतिकूल परिस्थितीमध्ये जिथे सामान्य विमान जाऊ शकत नाही, त्याठिकाणी देखील हे विमान नेता येऊ शकेल.

काय आहे करार

या विमानांसाठी भारताने स्पेनसोबत करार केला आहे. यातील पहिले 16 विमान स्पेनमध्ये तयार होतील. तर पुढील 40 विमानं ही टाटा एडव्हान्स सिस्टम्स लिमिटेड (TASL) बनवणार आहे. यासाठी टाटा कंपनी वडोदऱ्यामध्ये फॅक्टरी उभारत आहे. 2026 पर्यंत फॅक्टरी तयार होऊन, विमानांची निर्मिती सुरू होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात विजयी मिरवणूक काढण्यास सक्त मनाई; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: माहीम मतदारसंघात चोख सुरक्षा व्यवस्था

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

Versova Assembly Constituency Result: भारती लव्हेकर विरुद्ध हारून खान

SCROLL FOR NEXT