Tata Indica Car Story esakal
विज्ञान-तंत्र

Ratan Tata: रतन टाटा यांची 'इंडिका' ते 'जॅग्वार-लँड रोव्हर' पर्यंतची यशोगाथा,वाचा एका क्लिकमध्ये..

Saisimran Ghashi

TATA Indica : उद्योगपती व टाटा सन्सचे माजी चेअरमन रतन टाटा यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले आहे. रात्री उशिरा टाटांच्या निधनाचे वृत्त समजल्यानंतर देशभरात शोक व्यक्त केला जात आहे. पद्म विभूषण पुरस्काराने सन्मानित रतन टाटा यांचे दक्षिण मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात रात्री साडेअकरा वाजता निधन झाले.

आज आम्ही तुम्हाला टाटा इंडिकाची कास स्टोरी सांगणार आहोत. भारताच्या वाहन उद्योगातील महत्त्वपूर्ण टप्प्यांपैकी एक म्हणजे टाटा मोटर्सची पहिली पूर्णतः स्वदेशी कार ‘टाटा इंडिका’. 1998 साली टाटा मोटर्सने ही कार बाजारात आणली आणि ती देशातील पहिली पूर्णतः भारतीय प्रवासी कार म्हणून ओळखली जाते. सुरुवातीला कार विश्लेषकांकडून ‘इंडिका’वर टीका झाली, मात्र तिच्या दमदार इंजिन, इंधन कार्यक्षमतेमुळे आणि योग्य विपणन धोरणामुळे ती बाजारात तग धरू शकली. ‘अधिक जागा, कमी खर्च’ हे तिचं घोषवाक्य होतं, ज्यामुळे मध्यमवर्गीयांमध्ये ती लोकप्रिय झाली.

‘इंडिका’च्या यशस्वी प्रवासामुळे टाटा मोटर्सने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपले पाय रोवले. दक्षिण आफ्रिका, यूके, इटली, स्पेन अशा विविध देशांमध्ये ‘इंडिका’ला मोठी मागणी होती. भारतात या कारने टॅक्सी उद्योगात मोठा ठसा उमटवला आणि सामान्यांसाठी ती परवडणारी पर्याय ठरली.

मात्र, या यशापर्यंत पोहोचण्याचा प्रवास टाटा मोटर्ससाठी सोपा नव्हता. 1999 मध्ये, इंडिका बाजारात अपेक्षित यश मिळवू शकत नव्हती.

त्यामुळे टाटा मोटर्सने आपला प्रवासी कार व्यवसाय विकण्याचा निर्णय घेतला. रतन टाटा आणि त्यांची टीम अमेरिकन वाहन निर्माता फोर्डसोबत व्यवहार करण्यासाठी अमेरिकेला गेले. मात्र, फोर्डचे चेअरमन बिल फोर्ड यांनी टाटांच्या या व्यवसायावर टीका केली.

या अनुभवाने रतन टाटा यांना अधिक प्रेरित केले आणि त्यांनी व्यवसाय विकण्याचा निर्णय मागे घेतला. पुढील काही वर्षांत टाटा मोटर्सने फक्त यशच मिळवलं नाही तर 2008 मध्ये त्यांनी जगप्रसिद्ध ब्रँड्स ‘जॅग्वार’ आणि ‘लँड रोव्हर’ फोर्डकडून विकत घेतले. या व्यवहारामुळे टाटा मोटर्स केवळ भारतातच नव्हे तर जागतिक स्तरावरही एक अग्रगण्य वाहन निर्माता कंपनी म्हणून ओळखली जाऊ लागली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ratan Tata : भावुक क्षण! रतन टाटांच्या लाडक्या 'गोवा' ने घेतले अंत्यदर्शन; काय आहे हृदयस्पर्शी कहाणी?

Ratan Tata: इस्रायलपासून ते अमेरिकेपर्यंत... टाटा समूहाचे साम्राज्य विदेशात किती पसरले आहे?

Latest Maharashtra News Updates : रतन टाटांच्या पार्थिवाला पोलिसांकडून मानवंदना

Mokhada News : अर्ध्या तासाच्या वादळी पावसाने मोखाड्यात ऊडवली दाणादाण; सुदैवाने जिवीतहानी टळली..

शिल्पा शेट्टी- राज कुंद्रा यांना जुहूमधील घर खाली करण्याची नोटीस; पुण्यातील फार्म हाऊसदेखील केलं सील

SCROLL FOR NEXT