realme 9 pro plus 5g and realme 9 pro 5g launched with some amazing features check full details  
विज्ञान-तंत्र

Realme चे दोन नवीन स्मार्टफोन; मिळेल दमदार कॅमेरा अन् अनेक भन्नाट फीचर्स

सकाळ डिजिटल टीम

Realme ने भारतात आपले 2 बेस्ट स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. हे Realme 9 Pro 5G आणि Realme 9 Pro + 5G स्मार्टफोन या मिड-रेंज प्राइस सेगमेंटमधील हे दोन्ही स्मार्टफोन फ्लॅगशिप कॅमेरे आणि लाइट-शिफ्ट डिझाइनसह येतात. लाइट-शिफ्ट डिझाइनमुळे स्मार्टफोनचा मागील भाग कलच चेंजिंग इफेक्ट देतो. या दोन्ही स्मार्टफोनमध्ये डायनॅमिक रॅम एक्सपांड तंत्रज्ञान देण्यात आले आहे. तसेच परफॉर्मंससाठी स्मार्टफोनमध्ये पावफुल 5G प्रोसेर्स देण्यात आले आहेत.

किंमत किती असेल?

Realme च्या या स्मार्टफोन्सच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, Realme 9 Pro 5G ची किंमत 17,999 रुपयांपासून सुरु होते. सध्या, ही एक इंट्रोडक्टरी प्राइस ऑफर आहे. ही 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज सह व्हेरिएंटची ही किंमत आहे. त्याच वेळी, फोनच्या 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 20,999 रुपये आहे. Realme 9 Pro 5G स्मार्टफोनची विक्री 23 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजता realme.com, Flipkart आणि मेनलाइन चॅनेलवर होईल. HDFC बँक डेबिट, क्रेडिट कार्ड आणि EasyEMI द्वारे फोन खरेदी केल्यास 2,000 इंस्टंट सूट मिळेल. ही डिस्काउंट ऑफर फक्त Flipkart आणि realme.com वर पहिल्या सेलसाठी आहे.

Realme 9 Pro + 5G ची किंमत 24,999 रुपये पासून सुरु होते. ही किंमत 6 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज असलेल्या वेरिएंटसाठी आहे. फोनच्या 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 26,999 रुपये आहे. त्याच वेळी, स्मार्टफोनच्या 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेजसह व्हेरिएंटची किंमत 28,999 रुपये आहे. Realme 9 Pro Plus 5G स्मार्टफोनची पहिली विक्री 21 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजता होईल. HDFC बँक डेबिट, क्रेडिट कार्ड आणि EasyEMI द्वारे फोन खरेदी केल्यास 2,000 इंस्टंट सूट मिळेल. ही सवलत ऑफर फक्त Flipkart आणि realme.com वर पहिल्या सेलसाठी आहे. दोन्ही स्मार्टफोन सनराइज ब्लू, मिडनाईट ब्लॅक आणि अरोर ग्रीन कलर ऑप्शनमध्ये येतात.

Realme 9 Pro +चे स्पेसिफिकेशन्स

Realme 9 Pro Plus 5G स्मार्टफोनच्या फीचर्स बद्दल बोलायचे झाल्यास, त्यात 6.4-इंचाचा AMOLED डिस्प्ले दिला आहे. स्मार्टफोन 90Hz च्या रीफ्रेश रेट आणि 360Hz च्या सॅम्पलिंग रेटसह येतो. Realmeच्या या स्मार्टफोनमध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 चे संरक्षण देण्यात आले आहे. Realme 9 Pro Plus स्मार्टफोनमध्ये हार्ट रेट सेन्सरसह इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आहे. Realme 9 Pro+ हा MediaTek Dimensity 920 5G प्रोसेसरसह येणारा जगातील पहिला स्मार्टफोन आहे.

44 मिनिटांत होतो पूर्ण चार्ज

Realme 9 Pro + स्मार्टफोनच्या मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनच्या मागील बाजूस मुख्य कॅमेरा 50 मेगापिक्सेलचा आहे. याशिवाय फोनच्या मागील बाजूस 8-मेगापिक्सलचा सुपर वाईड कॅमेरा देण्यात आला आहे. तिसरा कॅमेरा 2-मेगापिक्सलचा मॅक्रो लेन्स आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनच्या फ्रंटमध्ये 16-मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे. Realme 9 Pro+ मध्ये 4500 mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 60W सुपरडार्ट चार्जला सपोर्ट करते. कंपनीचा दावा आहे की हा स्मार्टफोन केवळ 15 मिनिटांत 50 टक्के चार्ज होतो. त्याच वेळी, स्मार्टफोन 44 मिनिटांत पूर्ण चार्ज होतो.

Realme 9 Pro 5G चे स्पेसिफिकेशन्स

Realme 9 Pro स्मार्टफोनमध्ये 6.6-इंचाचा फुल HD डिस्प्ले दिला आहे. स्मार्टफोन 120Hz रिफ्रेश रेटसह दिला आहे. हा स्मार्टफोन 2 स्टोरेज व्हेरियंटमध्ये येतो. Realme 9 Pro 5G स्मार्टफोनमध्ये Qualcomm Snapdragon 695 5G प्रोसेसर देण्यात आले आहे. स्मार्टफोनची 5000 mAh बॅटरी कंपनीच्या 33W डार्ट चार्जिंग सोल्यूशनला सपोर्ट देते. कंपनीचा दावा आहे की हा स्मार्टफोन 27 मिनिटांत 50 टक्के चार्ज होतो.

यामध्ये 64 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा देण्यात आला आहे. Realme 9 Pro स्मार्टफोनच्या मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. स्मार्टफोनच्या मागील बाजूस मुख्य कॅमेरा 64 मेगापिक्सेलचा आहे. याशिवाय फोनच्या मागील बाजूस 8-मेगापिक्सलचा सुपर-वाइड अँगल लेन्स आणि 2-मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनच्या फ्रंटमध्ये 16-मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: हितेंद्र ठाकूरांचा गड कोसळला; पालघर जिल्ह्यात महायुतीचा दबदबा वाढला

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सचिन पाटील 13327 मतांनी आघाडीवर

Satara-Jawali Assembly Election 2024 Results : साताऱ्यात भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले 1 लाख 40 हजार 120 मतांनी विजयी; राज्यात रेकॉर्डब्रेक मताधिक्य

Ambegaon Assembly Election 2024 result live: दिलीप वळसे-पाटील आठव्यांदा आमदार होणार; शिष्य देवदत्त निकम पराभूत

Maharashtra Election 2024: प्रविण दरेकरांचा 'तो' दावा खरा ठरला! राज्यात महायुतीचेच सरकार येणार

SCROLL FOR NEXT