Realme C25Y launched in India : Realme ने आपला नवीन स्मार्टफोन Realme C25Y भारतीय बाजारपेठेत बजेट सेगमेंट मध्ये लॉन्च केला आहे. Realme C25Y मध्ये 50 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला असून Realmeच्या सी सीरिजचा हा पहिला स्मार्टफोन आहे, ज्यात 50 मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. हा फोन 4 GB + 64 GB आणि 4 GB + 128 GB व्हेरियंट मध्ये लॉन्च करण्यात आला असून.
फीचर, स्पेसिफिकेशन
या फोनमध्ये कंपनी 720 x 1600 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.5-इंच HD + LCD देण्यात येत आहे. हा डिस्प्ले 60Hz च्या रिफ्रेश रेट आणि 20: 9 च्या आस्पेक्ट रेशोसह येतो. हा फोन 4 जीबी LPDDR4x रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आले आहे. प्रोसेसर म्हणून कंपनीने या फोनमध्ये ऑक्टा-कोर Unisoc T610 चिपसेट दिला आहे, जो ARM Mali-G52 GPU सह येतो.
फोनच्या मागे तुम्हाला फिंगरप्रिंट सेन्सरसह या फोनमध्ये फोटोग्राफीसाठी LED फ्लॅश, AI ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळेल. यात 2 मेगापिक्सेल ब्लॅक अँड व्हाईट लेन्स 50 मेगापिक्सल प्राइमरी सेन्सर आणि 2 मेगापिक्सल मॅक्रो लेन्सचा समावेश आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.
या स्मार्टफोनमध्ये 5000mAh ची बॅटरी दिली आहे, जी 18W फास्ट चार्ज टेक्नॉलॉजीसह येते. हा Realme फोन 2 नॅनो सिम आणि मायक्रो एसडी कार्ड स्लॉटसह येतो. कनेक्टिव्हिटीसाठी कंपनी वाय-फाय 802.11 बी/जी/एन, ब्लूटूथ 5.0 आणि 3.5 एमएम हेडफोन जॅकसारखे पर्याय देण्यात आलेले आहेत. OS बद्दल बोलायचे झाले तर हा फोन Android 11 वर आधारित Realme R Edition वर चालतो.
किंमत
या स्मार्टफोनच्या 64 जीबी व्हेरियंटची किंमत 10,999 रुपये आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरियंटची किंमत 11,999 रुपये आहे. ग्लेशियर ब्लू आणि मेटल ग्रे याकलर ऑप्शन्समध्ये हे फोन उपलब्ध असतील Realme C25Y साठी प्री-बुकिंग 20 सप्टेंबर रोजी दुपारी 12 पासून सुरू होईल. तुम्ही कंपनीच्या अधिकृत वेबसाइट आणि फ्लिपकार्टवर या फोनचे प्री-बुकिंग देखील करू शकतात. फोनचा पहिला सेल हा 27 सप्टेंबर रोजी आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.