realme c31 launch date confirm on 31 march 2022 check details  
विज्ञान-तंत्र

Realme C31 लाँचची तारीख कन्फर्म! 'या' दिवशी होणार भारतात दाखल

सकाळ डिजिटल टीम

Realme चा नवीन स्मार्टफोन Realme C31 च्या लॉन्च डेट कंन्फर्म झाली आहे. Realme C31 स्मार्टफोन भारतात 31 मार्च 2021 रोजी लाँच होईल. Realme C31 स्मार्टफोन 31 मार्च रोजी दुपारी 12.30 वाजता लॉन्च होणार आहे. या फोनमध्ये ग्राहकांना अल्ट्रा स्लीक डिझाइन आणि दमदार बॅटरी मिळणार आहे

काय असेल खास?

Realme C31 स्मार्टफोनमध्ये 6.5-इंचाचा डिस्प्ले दिला जाईल. त्याचा स्क्रीन टू बॉडी रेशो 88 टक्के असेल. तसेच त्याची स्क्रीन रिझोल्यूशन 900x1600 पिक्सेल आहे. फोन 12nm Unisoc T612 प्रोसेसर सपोर्टसह येईल. Realme C31 मध्ये Android 11 आधारित Realme UI R एडिशन आहे.

तसेच फोनमध्ये तुम्हाला 4 GB RAM सह 128 GB पर्यंत स्टोरेज मिळेल. Realme C31 स्मार्टफोन कंफर्टेबल ग्रीप आणि अधिक स्टायलिश लुकमध्ये येईल. जर आपण बॅटरीबद्दल बोलायचे झाले तर Realme 31 स्मार्टफोन 5000mAh बॅटरीसह ऑफर केला जाऊ शकतो. फोन अल्ट्रा सेव्हिंग बॅटरी मोडसह येईल. Realme C31 स्मार्टफोनमध्ये 13MP AI ट्रिपल रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. त्याची प्राथमिक लेन्स 13 मेगापिक्सेल असेल. याशिवाय मॅक्रो लेन्स आणि थर्ड पोर्ट्रेट लेन्स देण्यात येणार आहेत. सेल्फीसाठी फोनमध्ये 5 मेगापिक्सेल कॅमेरा मिळेल. कनेक्टिव्हिटीसाठी, Realme C31 मध्ये 4G LTE, Wi-Fi, Bluetooth v5, 3.5mm हेडफोन जॅक आणि USB Type-C पोर्ट आहे.

Realme GT 2 Pro

Realme C31 नंतर, Realme GT 2 Pro 7 एप्रिल 2022 रोजी दुपारी 12.30 वाजता लॉन्च होईल. हा जगातील पहिला पेपर इंस्पायर्ड डिझाइन फोन आहे. ज्याचे डिझाईन औद्योगिक डिझायनर नाओतो फुकासावा यांनी केले आहे. फोन स्नॅपड्रॅगन 8 जनरेशन 1 चिपसेट सपोर्टसह येईल. हा जगातील पहिला 2K AMOLED फ्लॅट डिस्प्ले फोन आहे. जे LTPO 2.0 तंत्रज्ञानासह येईल. फोनमध्ये 6.7 इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे. ज्याची पीक ब्राइटनेस लेव्ह 1400nits आहे. फोनचा स्क्रीन रिफ्रेश रेट 120Hz असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aheri Assembly Election Results 2024 : बापाने केला लेकीचा पराभव! अहेरी मतदारसंघात धर्मरावबाबा आत्राम यांनी मारली बाजी

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: हा ऐतिहासिक विजय, जनतेचे आभार- शिंदे

khadakwasla Assembly Election 2024 Result Live: खडकवासलात भाजपचा विजयाचा चौकार, भीमराव तापकीर यांनी पुन्हा मारली बाजी

Rajan Naik Nalasopara Assembly Election 2024 Result : नालासोपाऱ्याचा गड भाजपचाच; राजन नाईक यांचा दणदणीत विजय

Dapoli Assembly Election 2024 Results : दापोलीत आमदार योगेश कदमांनी राखला गड; ठाकरे गटाच्या संजय कदमांचा केला पराभव

SCROLL FOR NEXT