Realme C67 5G Price eSakal
विज्ञान-तंत्र

Realme C67 5G : 15 हजारांच्या स्मार्टफोनमध्ये आयफोनचं फीचर; रिअलमीने करुन दाखवलं!

Realme Budget Smartphone : रिअलमीने आपल्या बजेट सेगमेंटमधील नवीन स्मार्टफोन आज लाँच केला.

Sudesh

Realme new Smartphone Launched : रिअलमी कंपनीने स्मार्टफोन मार्केटमध्ये मोठा धमाका केला आहे. अवघ्या 15 हजारांच्या बजेटमध्ये रिअलमीने 50 मेगापिक्सल कॅमेरा, फास्ट चार्जिंग आणि एक प्रीमियम फीचर असणारा स्मार्टफोन लाँच केला आहे. Realme C67 असं या 5G स्मार्टफोनचं नाव आहे.

फीचर्स

रिअलमीच्या या फोनमध्ये 6.72 इंच FHD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. याचा टच सॅम्पलिंग रेट 180Hz आहे. तर ब्राईटनेस 680 निट्स आहे. या फोनमध्ये 5,000 mAh बॅटरी आहे, जी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

या फोनमध्ये MediaTek Dimensity 6100+ SoC चिपसेट देण्यात आली आहे. ग्राफिक्ससाठी यात Mali G57 MC2 GPU देण्यात आलं आहे. C67 मध्ये अँड्रॉईड 13 आधारित Realme UI 4.0 हा क्लीन यूआय देण्यात आला आहे. हा फोन Sunny Oasis आणि Dark Purple या दोन रंगांमध्ये लाँच करण्यात आलेला आहे.

विशेष म्हणजे, रिअलमीने या फोनमध्ये आयफोनच्या डायनॅमिक आयलँडसारखं दिसणारं मिनी कॅप्सुल हे फीचरही दिलं आहे. हे फीचर या फोनची खासियत आहे. हा स्मार्टफोन सगळ्यात स्लिम 5G फोन असल्याचा दावा कंपनीने केला आहे. सोबतच IP54 वॉटर रझिस्टंट टेक्नॉलॉजी असणारा देखील हा पहिलाच फोन असल्याचं Realme ने म्हटलं आहे.

कॅमेरे

या फोनमध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 50MP क्षमतेचा मुख्य कॅमेरा आहे. यामध्ये एआय सपोर्ट मिळतो. सोबत 2MP पोर्ट्रेट कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फीसाठी पुढच्या बाजूला 8MP फ्रंट कॅमेरा आहे.

स्टोरेज

या फोनच्या बेस व्हेरियंटमध्ये 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज मिळतं. तसंच, टॉप व्हेरियंटमध्ये 6GB रॅम आणि 128 GB स्टोरेज देण्यात आलं आहे. SD कार्डच्या सहाय्याने याचं स्टोरेज 2TB पर्यंत वाढवता येतं.

किंमत अन् ऑफर्स

या फोनच्या बेस व्हेरियंटची किंमत 13,999 रुपये आहे, तर टॉप व्हेरियंटची किंमत 14,999 रुपये आहे. लाँच ऑफरमध्ये या फोनवर एक हजार रुपयांची सूट मिळत आहे. सोबतच ठराविक बँक कार्डवर अतिरिक्त 1,000 रुपयांची सूट मिळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yogendra Yadav: हरियानाच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रात काय होणार? योगेंद्र यादव यांनी केलं भाकीत

Farmers Protest: दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन; उपोषणाची घोषणा! दिल्लीच्या दिशेने ट्रॅक्टर्स होणार रवाना

पाकिस्तान क्रिकेटची 'सर्कस'! Champions Trophy 2025 साठी निवडला नवा प्रभारी कोच; जेसन गिलेस्पी आता फक्त...

Winter Kitchen Cleaning Tips: किचन हे आरोग्याचे अन् रोगाचे माहेरघर! हिवाळ्यात अशा प्रकारे स्वयंपाकघराची ठेवा स्वच्छता

Share Market Closing: सेन्सेक्स-निफ्टी घसरणीसह बंद; निफ्टी बँकेत तेजी, कोणते शेअर्स वधारले?

SCROLL FOR NEXT