Realme  google
विज्ञान-तंत्र

येतोय 1TB स्टोरेज असलेला पहिला स्मार्टफोन; जाणून घ्या अपेक्षित किंमत

सकाळ डिजिटल टीम

Realme चा स्मार्टफोन Realme GT 2 Pro या महिन्याच्या अखेरपर्यंच लॉन्च केला जाऊ शकतो. दरम्यान या स्मार्टफोनचा लूक आणि स्पेसिफिकेशन त्या आधिच लीक झाले असले तरी नुकतेच या स्मार्टफोनची रॅम, स्टोरेज आणि सॉफ्टवेअर बद्दल आणखी काही डिटेल्स लीक झाल्या आहेत. या लीकनुसार, कंपनीच्या या नवीन स्मार्टफोनच्या हाय-एंड मॉडेलमध्ये तब्बल 1TB ची स्टोरेज असू शकते आणि तसे असल्यास, हा कंपनीचा पहिला फोन असेल, जो 1TB स्टोरेजसह येईल.

टिपस्टर इशान अग्रवालने रिअॅलिटी जीटी 2 प्रोच्या या नवीन स्मार्टफोनची स्क्रीन शेअर केली आहे. यावरून या फोनची रॅम आणि स्टोरेज क्षमता आणि सॉफ्टवेअर व्हर्जन यांसारख्या डिटेल्स समोर आल्या आहेत. गीकबेंच बेंचमार्किंग वेबसाइट आणि TENAA सर्टिफिकेशननुसार, फोनचे मॉडेल RMX3300 आहे जे GT 2 Pro शी रिलेटेड आहे आणि कदाचित यामध्ये 1TB स्टोरेज दिले जाऊ शकते.

स्मार्टफोन स्पेसिफिकेशन्स

Realme कंपनीने या आधी देखील त्याच्या स्मार्टफोनमध्ये 256GB आणि काही हाय-एंड मॉडेल्समध्ये हाय रॅम कॅपसीटी ऑफर केली आहे. अनेकदा असे स्मार्टफोन महाग असतात. कंपनीने या स्मार्टफोनमध्ये Snapdragon 8 Gen 1 प्रोसेसर वापरला आहे, ज्याबद्दल कंपनीने माहिती दिली आहे. याशिवाय, यात 12GB रॅम आहे जी तुम्ही 3GB पर्यंत वाढवू शकता. याशिवाय या स्मार्टफोनमध्ये Android 12 आधारित Reality UI 3.0 सॉफ्टवेअर देण्यात आले आहे.

या स्मार्टफोनमध्ये सोनी IMX766 सेन्सरसह 50-मेगापिक्सल कॅमेरा, 5000mAh बॅटरी आणि 125W फास्ट चार्जिंग दिले जाऊ शकते. लीक झालेल्या स्मार्टफोनचे डिझाईन हे गुगलच्या Nexus 6P सारखे आहे. याशिवाय स्मार्टफोनमध्ये 120Hz AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. कंपनीच्या या नवीन स्मार्टफोनची किंमत भारतीय चलनात सुमारे 60,000 रुपये असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पारा घसरला; आजपासून थंडीचा जोर वाढणार

Rahul Gandhi : मोदींचा डोळा राज्याच्या संपत्तीवर...राहुल गांधी यांचा भाजपवर घणाघात

Anil Deshmukh: अनिल देशमुखांवर हल्ला कसा झाला, नेमकं काय घडलं? हल्लेखोर देत होते भाजप जिंदाबादच्या घोषणा? मोठा रिपोर्ट समोर

Sakal Podcast: युक्रेनला क्षेपणास्त्र वापरण्याची अमेरिकेनं दिली परवानगी ते बाबा सिद्दीकी हत्येतील मास्टरमाईंडला अटक

थंडीत उर्जा रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी आहारात काय असावे? ‘हे’ ७ पदार्थ आहारात ठेवा, होतील फायदेच फायदे

SCROLL FOR NEXT