Realme GT 7 Pro Smartphone Full Battery in Just 5 Minutes Feature esakal
विज्ञान-तंत्र

Fast Charging Smartphone : फक्त पाच मिनिटात फुल चार्जिंग; ही कंपनी लाँच करतीये ब्रॅंड स्मार्टफोन,अजून काय खास?

Realme GT 7 Pro Smartphone : एका कंपनीने 300W फास्ट चार्जिंग तंत्रज्ञान विकसित केले आहे. यामुळे तुमचा फोन फक्त काही मिनिटांत पूर्ण चार्ज होऊ शकेल.

Saisimran Ghashi

Realme GT 7 Pro Fast Charging Mobile : मोबाईल आणि टेक्नॉलॉजीमध्ये एका नव्या सुपरफास्ट युगाची सुरुवात होण्याच्या मार्गावर आहे. आतापर्यंत आपण 80W, 120W आणि अगदी 210W पर्यंतच्या फास्ट चार्जिंगबद्दल ऐकले असेल. पण आता यापेक्षाही आश्चर्यकारक बातमी आहे. एका कंपनीने 300W फास्ट चार्जिंग तंत्रज्ञान विकसित केले आहे. यामुळे तुमचा फोन फक्त काही मिनिटांत पूर्ण चार्ज होऊ शकेल.

याबाबतची माहिती लीक झाली असून रियलमी या ब्रँडने हे तंत्रज्ञान विकसित केले आहे. असे म्हणतात की, रियलमी GT 7 Pro या फोनमध्ये हे तंत्रज्ञान वापरले जाऊ शकते. या फोनचे लॉन्च या वर्षाच्या अखेरीस होण्याची शक्यता आहे.

या फोनमध्ये 5000 mAh ची बॅटरी असू शकते जी फक्त पाच मिनिटांत पूर्ण चार्ज होईल. याशिवाय या फोनला IP69 रेटिंग मिळण्याची शक्यता आहे. याचा अर्थ असा की हा फोन पाण्यापासून आणि धुळीतही सुरक्षित राहील.

रियलमीसोबतच रेडमीनेही आपल्या रेडमी 12 डिस्कवरी एडिशनमध्ये 300W फास्ट चार्जिंग तंत्रज्ञान दाखवले आहे. या तंत्रज्ञानाने फक्त 5 मिनिटांत 4100 mAh ची बॅटरी पूर्णपणे चार्ज होते.

या तंत्रज्ञानामुळे मोबाईल फोनच्या चार्जिंगच्या संकल्पनेत एक क्रांतीच घडणार आहे. आता तुम्हाला फोन चार्ज होण्याची जास्त वेळ वाट पाहावी लागणार नाही.

मोबाईल वापरकर्त्यांसाठी ही खरोखरच एक जबरदस्त बातमी आहे. या तंत्रज्ञानाचा आपल्या दैनंदिन जीवनावर मोठा प्रभाव पडणार आहे. या मोबाईलच्या लॉंचची सर्वांना मोठी उत्सुकता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ulhasnagar Crime : उल्हासनगरातील 'त्या' चिमुकलीची मामानेच हत्या केल्याचा उलगडा

Phulambri Assembly Election Voting : मतांच्या विभाजनावर ठरणार उमेदवारांचे भवितव्य..!

Mahim Constituency: 'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

IND vs AUS : ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी रचला इतिहास; एकत्रित ५०० विकेट्स घेणारे जगातले पहिलं गोलंदाजी युनीट

Kitchen Hacks : थंडीत भांडी घासायचं जीवावर येतंय? या सोप्या ट्रिक आजमवा, काम सोप्प होईल

SCROLL FOR NEXT