Fast Mobile Charging Technology : कधी महत्वाच्या कामाच्यावेळी किंवा मूवी बघताना,अडचणीत असताना स्मार्टफोनची बॅटरी संपली की त्रास होतो ना? Realme ने तुमच्या या त्रासाला कायमचा निरोप देण्यासाठी काहीतर खास आणले आहे. कंपनीने 320W चार्जिंगची घोषणा केली आहे, जी आत्तापर्यंतची सर्वात जलद चार्जिंग टेक्नॉलॉजी आहे. या टेक्नॉलॉजीमुळे तुमचा फोन फक्त 4 मिनिटांत 0 ते 100% चार्ज होईल.
आतापर्यंत Realme आणि Xiaomi या कंपन्यांनी वेगवान चार्जिंगच्या क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे. Realme ने यापूर्वी GT सीरिजमध्ये 240W चार्जिंग दाखल केली होती, तर Xiaomi ने 300W चार्जिंगची झलक दाखवली होती. पण आता Realme थेट 320W चार्जिंगची सुविधा घेऊन आलंय.
Realme ची 320W चार्जर ही त्यांची 240W चार्जिंगची अपग्रेडेड आवृत्ती आहे. विशेष म्हणजे, या चार्जरचं आकारमान वाढवले नाही. या चार्जरमध्ये दोन USB-C पोर्ट आहेत. एक पोर्ट Realme चा फोन 150W पर्यंत चार्ज करेल, तर दुसरा पोर्ट लॅपटॉप किंवा इतर डिव्हायसेस 65W पर्यंत चार्ज करेल.
कंपनीने केलेल्या डेमो व्हिडिओमध्ये 4 मिनिट 30 सेकंदात 4420mAh बॅटरी असलेला फोन पूर्ण चार्ज केला. याचा अर्थ असा, की ही चार्जिंग टेक्नॉलॉजी Xiaomi ची 300W चार्जिंगपेक्षाही जलद आहे. Xiaomi ची चार्जिंग 4100mAh बॅटरी असलेला फोन 5 मिनिटांत चार्ज करते.
अशाप्रकारे जलद चार्जिंगमुळे बॅटरी खराब होणे, फोन गरम होणे किंवा स्फोट होण्याचा धोका तर नाही ना? हा प्रश्न सर्वांच्या मनात आहे. मात्र, Realme, OnePlus आणि Oppo या कंपन्यांनी दाखवून दिलं आहे की वेगवान चार्जिंग टेक्नॉलॉजी सुरक्षितपणे वापरता येते. या कंपन्यांनी आतापर्यंत अनेक हाय-वॉटेज चार्जिंग सोल्युशन्स आणली आहेत आणि सुरक्षेच्या दृष्टीने कोणत्याही मोठ्या समस्या आढळलेल्या नाहीत. 320W ही संख्या मोठी वाटली तरी Realme ने तापमान नियंत्रण आणि इंटेलिजेंट चार्जिंग मॅनेजमेंट सिस्टमनसारखे अनेक सुरक्षा उपाय समाविष्ट केले असतील तर आश्चर्य वाटणार नाही.
Realme ने आतापर्यंत ज्या प्रकारे चार्जिंग टेक्नॉलॉजीमध्ये सुधारणा केल्या आहेत, त्यावरून अंदाज येतो की ही 320W चार्जिंगही सुरक्षितच असेल. भविष्यात फक्त काही मिनिटांत फोन चार्ज होईल आणि त्यामुळे आपला फोन चार्ज होण्याची वाट पाहण्याची गरज राहणार नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.