Realme Products Launch eSakal
विज्ञान-तंत्र

Realme C53 & Pad 2 : 10 हजारात 108 MP कॅमेऱ्याचा फोन, 20 हजारात टॅब! रिअलमीचे दोन दमदार प्रॉडक्ट्स लाँच

Sudesh

रिअलमी कंपनीने आज दोन नवीन प्रॉडक्ट्स लाँच केले आहेत. यामध्ये एक बजेट स्मार्टफोन आणि टॅबलेटचा समावेश आहे. या दोन्ही प्रॉडक्ट्समध्ये अगदी परवडणाऱ्या दरात दमदार फीचर्स देण्यात आले आहेत.

Realme C53

रिअलमीने आज आपला C53 हा स्मार्टफोन लाँच केला आहे. अवघ्या 9,999 हजार रुपयांच्या या फोनमद्ये तब्बल 108 मेगापिक्सल क्षमतेचा कॅमेरा देण्यात आला आहे. पहिल्यांदाच दहा हजारपेक्षा कमी किंमतीच्या फोनमध्ये असा कॅमेरा देण्यात आला आहे. (Realme Mobile)

इतर फीचर्स

या फोनमध्ये 6.74 इंच मोठा आयपीएस एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. यामध्ये 90 हर्टज रिफ्रेश रेट आणि 560 निट ब्राईटनेस दिली आहे. यामध्ये 6 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज असणारं एक व्हेरियंट आहे. सोबतच, 4 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज असणारं व्हेरियंट देखील देण्यात आलं आहे. या फोनमध्ये 5000 mAh क्षमतेची तगडी बॅटरी देण्यात येईल. ही बॅटरी 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. हा फोन 4G असणार आहे.

किंमत

रिअलमी C53 फोनच्या 4 जीबी रॅम असणाऱ्या व्हेरियंटची किंमत 9,999 रुपये आहे. तर, 6 जीबी रॅम असणाऱ्या व्हेरियंटची किंमत 10,999 रुपये आहे.

अर्ली बर्ड सेल

आज (19 जुलै) संध्याकाळी सहा ते रात्री आठ वाजेपर्यंत या फोनसाठी 'अर्ली बर्ड सेल' सुरू राहणार आहे. फ्लिपकार्ट आणि रिअलमीच्या वेबसाईटवर हा सेल सुरू असेल. यामध्ये फोनच्या 6+64 जीबी व्हेरियंटवर 1,000 रुपयांची सूट मिळू शकते.

Realme Pad 2

आज रिअलमीने आपला नवीन टॅबलेट (Realme Tablet) देखील लाँच केला आहे. Realme Pad 2 असं या टॅबचं नाव आहे. 2021 साली कंपनीने Realme Pad लाँच केला होता, याचं हे पुढचं व्हर्जन आहे. यामध्ये 11.5 इंच LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 2K रिझॉल्यूशनला सपोर्ट करेल, तसेच यात 120Hz रिफ्रेश रेट असणार आहे. याची पीक ब्राईटनेस ही 450 निट्स आहे.

यामध्ये Mediatek Helio G99 प्रोसेसर देण्यात आला आहे. तर अँड्रॉईड-13 वर आधारित रिअलमी यूआय 4.0 ओएस यात असणार आहे. याची बॅटरी 8,360 mAH क्षमतेची आहे, जी 33W चार्जिंगला सपोर्ट करते. हा टॅब ग्रे आणि ग्रीन अशा दोन रंगांमध्ये उपलब्ध आहे.

किंमत

यामध्ये 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज असणाऱ्या व्हेरियंटची किंमत 19,999 रुपये आहे. तर, 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज असणाऱ्या व्हेरियंटची किंमत 22,999 रुपये आहे. फ्लिपकार्ट किंवा रिअलमीच्या वेबसाईटवर विविध ऑफर्सच्या माध्यमातून यावर २००० रुपयांपर्यंतची सूट मिळू शकते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र, खासदार श्रीकांत शिंदेंनी महाकाल मंदिराचे नियम मोडले; मंदिराच्या गर्भगृहात केला प्रवेश

Chh.Sambhajinagar Assembly Election 2024 : विस्तारित भागांना प्रतीक्षा सुविधांची!

एसी जिममध्ये घाम गाळणाऱ्यांना गश्मीर महाजनीने दिला खास सल्ला; म्हणाला- एका चुकीच्या इन्स्ट्रक्टरमुळे मी...

Latest Maharashtra News Updates : पुण्यातील हडपसर, कोथरूड, कसबा, शिवाजीनगर, पर्वती या जागांवर मनसे उमेदवार देणार

High Court : कब्रस्थान, दफनभूमीची जागा वापरता येईल? रेल्वे उड्डाणपूल प्रकरणी उच्च न्यायालयाची विचारणा

SCROLL FOR NEXT