Realme Narzo 50 Launch in India 
विज्ञान-तंत्र

Realme Narzo 50 भारतात लॉन्च, मिळेल 33W फास्ट चार्जिंग, 50MP कॅमेरा

सकाळ डिजिटल टीम

Realme ने भारतात आपला नवीन स्मार्टफोन Realme Narzo 50 लॉन्च केला आहे. Realme Narzo 50 मध्ये MediaTek Helio G96 प्रोसेसर देण्यात आला आहे. Realmeच्या या फोनला 120Hz रीफ्रेश रेट आणि 600 nits च्या ब्राइटनेससह 6.6-इंचाचा IPS LCD डिस्प्ले मिळेल. फोनसोबत फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. Realme Narzo 50 च्या आधी, कंपनीने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये Realme Narzo 50i आणि Realme Narzo 50A सारखे फोन भारतात लॉंच केले आहेत.

Realme Narzo 50 ची किंमत (Price of Realme Narzo 50)

Realme Narzo 50 च्या 4 GB रॅम आणि 64 GB स्टोरेजची किंमत 12,999 रुपये आहे. त्याच वेळी, 6 जीबी रॅमसह 128 जीबी स्टोरेजची किंमत 15,499 रुपये आहे. फोन स्पीड ब्लॅक आणि स्पीड ब्लू कलरमध्ये खरेदी करता येईल. त्याची विक्री ३ मार्चपासून अॅमेझॉन आणि Realmeच्या साइटवरून होईल.

Realme Narzo 50 चे स्पेसिफिकेशन (Realme Narzo 50 Specifications)

Realme Narzo 50 मध्ये Android 11 आधारित Realme UI 2.0 आहे. फोनमध्ये 1080x2400 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.6-इंचाचा फुल HD+ डिस्प्ले आहे. डिस्प्लेचा रिफ्रेश दर 120Hz आहे. फोनमध्ये MediaTek Helio G96 प्रोसेसर आहे, 6 GB पर्यंत RAM आणि 128 GB पर्यंत स्टोरेज दिले आहे. तसेच यामधील RAM 11 GB पर्यंत वाढवता येते.

Realme Narzo 50 चा कॅमेरा

कॅमेरा बद्दल बोलायचे झाले तर Realme च्या या फोनमध्ये तीन रियर कॅमेरे आहेत ज्यात प्रायमरी लेन्स 50 मेगापिक्सेल आहे. दुसरी लेन्स 2 मेगापिक्सलची आणि तिसरी लेन्स 2 मेगापिक्सल्सची आहे. समोर 16-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

Realme Narzo 50 ची बॅटरी

कनेक्टिव्हिटीसाठी, फोनमध्ये 4G LTE, Wi-Fi, ब्लूटूथ आणि GPS सपोर्ट दिला आहे. यात 33W सुपरडार्ट फास्ट चार्जिंगसाठी सपोर्ट असलेली 5000mAh बॅटरी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT