Realme OnePlus Mobile Data eSakal
विज्ञान-तंत्र

Realme, One Plus चे फोन वापरताय तर सावधान! मोबाईलच चोरतोय तुमचा खासगी डेटा; लगेच बदला 'ही' सेटिंग

इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी याबाबत चौकशीचे आदेश दिले आहेत.

Sudesh

गेल्या काही वर्षांमध्ये रिअलमी आणि वन प्लस या कंपन्यांनी भारतात झपाट्याने आपलं मार्केट वाढवलं आहे. देशात या ब्रँडचे फोन वापरणारे कोट्यवधी लोक आहेत. तुम्हीदेखील या ब्रँडचे फोन वापरत असाल, तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. कारण हे फोन तुमचा खासगी डेटा चोरत असल्याची माहिती समोर आली आहे.

ऋषी बागरी नावाच्या एका व्यक्तीने ट्विट करत ही माहिती दिली आहे. त्याने यामध्ये देशाचे इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांना टॅग करत हे ट्विट केले आहे. यावर राजीव यांनीही प्रतिक्रिया देत, याबाबत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

डेटा होतोय ट्रॅक

ऋषी आपल्या ट्विटमध्ये म्हणतो; की "माझ्याकडे रिअलमीचा फोन आहे, आणि यामध्ये Enhanced Intelligent Service हे फीचर आधीपासून सुरू आहे. हे फीचर फोनमधील एसएमएस, कॉल, ईमेल यासोबतच इतर खासगी डेटा ट्रॅक करतं.

चीनला जातोय डेटा?

"तुम्ही जेव्हा सेटिंग्समध्ये जाता तेव्हा हा पर्याय बाय डिफॉल्ट ऑन दिसतो. याबाबत भारतीय मोबाईल यूजर्सना कोणतीही माहिती दिली जात नाही. आधीपासून हा ऑप्शन सुरू असणं, म्हणजे आपल्या परवानगीशिवाय आपला डेटा ट्रॅक करणे असंच झालं. हा डेटा चीनला पाठवला जातोय का?" असं ऋषीने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

वनप्लसही सारखंच

अशाच प्रकारचे फीचर वनप्लसच्या फोनमध्येही दिसून आल्याचं आणखी एका ट्विटर यूजरने सांगितलं. यासोबतच ओप्पो, व्हिवो अशा इतर कंपन्यांची देखील चौकशी झाली पाहिजे अशी मागणी ट्विटर यूजर्स करताना दिसत आहेत.

कशासाठी आहे फीचर

फोन कंपन्यांच्या मते, यूजर्सचा स्मार्टफोन वापरण्याचा अनुभव अधिक चांगला होण्यासाठी हा डेटा ट्रॅक केला जातो. याच्या माध्यमातून तुमच्या मोबाईलची फंक्शनॅलिटी अधिक चांगली होते. मात्र अर्थातच, यासाठी तुमचे कॉन्टॅक्ट, इंटरनेट, मेसेज, लोकेशन असा तुमचा खासगी डेटा हा फोन ट्रॅक करतो. हा डेटा कुठे साठवला जातो याबाबत कोणतीही माहिती फोन कंपन्या देत नाहीत. त्यामुळेच ट्विटर यूजर्स आपला संताप व्यक्त करत आहेत.

असा करा बंद

तुमच्या फोनमध्येही हे फीचर आहे का हे तपासण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी मोबाईलच्या सेटिंग्समध्ये जावं लागेल. यानंतर सिस्टिम सर्व्हिसमध्ये जा. याठिकाणी तुम्हाला Enhanced Intelligent Service हा पर्याय दिसेल. हा पर्याय जर ऑन असेल. तर तुमचा डेटा ट्रॅक होतो आहे. याठिकाणी असलेल्या टॉगलवर क्लिक करून तुम्ही हा पर्याय बंद करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bajarang Punia: कुस्तीपटू बजरंग पुनियावर चार वर्षांची बंदी! नेमकं काय घडलंय?

Uddhav Thackeray: ठाकरेंच्या हातातून मुंबई महापालिकाही जाणार? वाचा काय आहेत पक्षा पुढील आव्हानं

Jitendra Awhad: चौथ्यांदा निवडून येवूनही आव्हाडांचे कार्यकर्ते नाराज; जाणून घ्या काय आहे कारण

EVM पडताळणीच्या मागणीचा अधिकार ‘या’ 2 पराभूत उमेदवारांनाच! प्रत्येक ‘ईव्हीएम’च्या पडताळणीसाठी भरावे लागतात 40 हजार रुपये अन्‌ 18 टक्के जीएसटी, मुदत 7 दिवसांचीच

Panchang 27 November: आजच्या दिवशी विष्णुंना पिस्ता बर्फीचा नैवेद्य दाखवावा

SCROLL FOR NEXT