Smartphone Tips : भारतात बजेट स्मार्टफोन शोधणाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. रेडमीने त्यांचा नवीन बजेट स्मार्टफोन Redmi A3x भारतात लाँच केला आहे. हा स्मार्टफोन लॉंच झाल्यानंतर लगेचच ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्मवर याला पसंती दाखवली जात आहे.
Redmi A3x मध्ये 1 टेराबाइटपर्यंत स्टोरेज आणि रॅम वाढवण्याची सुविधा आहे. तसंच, आकर्षक डिझाईन आणि दमदार बॅटरी ही या फोनची वैशिष्ट्ये आहेत.हा मोबाईल नक्कीच तुमच्या पसंतीस उतरण्यासारखा आहे.
Redmi A3x चार आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहे. त्यात तुम्हाला मिडनाइट ब्लॅक, ओशन ग्रीन, ऑलिव्ह ग्रीन आणि स्टारी व्हाइट हे आकर्षक रंग पाहायला मिळत आहेत. या फोनच्या 3GB रॅम आणि 64GB स्टोरेज व्हेरियंटची किंमत 6,999 रुपये आहे तर 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरियंटची किंमत 7,999 रुपये आहे. तुम्ही हा स्मार्टफोन Amazon आणि Xiaomi India च्या वेबसाइटवरून खरेदी करू शकता.
6.71 इंचाचा HD+ डिस्प्ले (90Hz रिफ्रेश रेट)
Unisoc T603 प्रोसेसर
3GB किंवा 4GB रॅम (8GB पर्यंत वाढवण्याची सुविधा)
64GB किंवा 128GB स्टोरेज (१TB पर्यंत वाढवता येते)
Android 14 वर आधारित HyperOS
8MP रियर कॅमेरा आणि 5MP फ्रंट कॅमेरा
5000mAh बॅटरी (10W चार्जिंग)
साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर आणि AI फेस अनलॉक
या किंमतीत दमदार फीचर्स आणि जास्त काळ टिकणाऱ्या बॅटरीसह Redmi A3x हा बजेट स्मार्टफोन खरेदीचा एक चांगला पर्याय ठरू शकतो. तुम्ही बजेटमध्ये चांगले फीचर्स असणारा स्मार्टफोन शोधत असाल तर तुमच्यासाठी हा स्मार्टफोन बेस्ट पर्याय ठरू शकतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.