redmi note 12 series redmi note 12 pro plus and realme 10 pro plus tipped to have curved amoled displays  
विज्ञान-तंत्र

Redmi Note 12 सीरीज लवकरच होणार लॉंच; काय असतील खास फीचर्स? वाचा सविस्तर

सकाळ डिजिटल टीम

Xiaomi लवकरच Redmi Note 12 सीरीज सादर करणार आहे. त्याचा टीझरही रिलीज झाला आहे. आता फोनचे फोटो देखील लीक झाले आहेत आणि असे म्हटले जात आहे की एकाच वेळी पाच फोन लॉन्च केले जातील, त्यापैकी Redmi Note 12 Pro+ मध्ये कर्व्ह्ड AMOLED डिस्प्ले मिळेल. जर खरंच असे असेल तर, Redmi Note 12 Pro+ हा कंपनीच्या Note सीरीजमधील पहिला फोन असेल ज्यामध्ये प्रीमियम डिझाइन डिस्प्ले असेल.

@maheshhir85 या ट्विटर हँडलवरून Redmi Note 12 Pro+ बद्दल ट्विट करण्यात आले आहे. या ट्विटमध्ये Realme 10 Pro + बद्दल देखील माहिती देण्यात आली आहे. असे म्हटले जात आहे की Realme 10 Pro + 120Hz रिफ्रेश रेटसह डिस्प्लेसह लॉन्च केला जाईल. याशिवाय या फोनमध्ये MediaTek Dimensity 1080 प्रोसेसर उपलब्ध असेल.

Redmi Note 12 Pro+ बद्दल अजून जास्त माहिती समोर आलेली नाही. Redmi Note 12 सीरीज 6nm octa-core MediaTek Dimensity 1080 प्रोसेसरसह ऑफर केली जाऊ शकते. यात ग्राफिक्ससाठी ARM Mali-G68 GPU असेल आणि 200-मेगापिक्सेल कॅमेरा देखील मिळू शकतो. फोनच्या सर्व मॉडेल्समध्ये 5G सपोर्ट उपलब्ध असेल.

Redmi Note 12 Pro+ आणि Redmi Note 12 Pro या स्मार्टफोन्सबद्दल TENAA डेटाबेसवर देखील माहिती देण्यात आली आहे. या दोन्ही फोनमध्ये 6.6-इंचाचा फुल एचडी प्लस एमोलेड डिस्प्ले मिळू शकतो, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz असेल. Redmi Note 12 Pro ला 4980mAh बॅटरी मिळण्याची अपेक्षा आहे आणि Note 12 Pro+ ला 4300mAh बॅटरी मिळेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL Auction 2025 : १५७४ खेळाडूंची नोंदणी, पण २०४ जणांनाच लागणार लॉटरी! ६४१ कोटींचं बजेट; जाणून घ्या सर्व डिटेल्स

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Shahu Chhatrapati: मधुरिमाराजेंनी उमेदवारी मागे का घेतली? शाहू छत्रपतींनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

SCROLL FOR NEXT