JioTag Air Tracker esakal
विज्ञान-तंत्र

JioTag Air: आता आपली कोणतीही आवडती वस्तू करता येणार ट्रॅक; जीओने बाजारात आणलंय स्वस्त ट्रॅकर डिव्हाईस

Reliance Jio launches affordable Apple AirTag alternative JioTag Air: हे किफायतशीर ट्रॅकिंग डिवाइस आहे ज्याची किंमत फक्त ₹ 1,499 आहे.

Saisimran Ghashi

JioTag : आपल्या किल्ल्या, गाडीच्या चाव्या, पाकीट किंवा अगदी तुमच्या लाडक्या पाळीव प्राण्यावर नजर ठेवण्यासाठी Jio चे एक धमाकेदार नवीन गॅझेट आले आहे. JioTag Air हे किफायतशीर ट्रॅकिंग डिवाइस आहे ज्याची किंमत फक्त ₹ 1,499 आहे.अॅप्पलच्या AirTags ची हे एक उत्तम पर्याय आहे ज्याची किंमत जवळपास ₹ 3,490 इतकी आहे.

JioTag Air ची खास वैशिष्ट्ये

आपल्या सर्व वस्तूंवर नजर: किल्ल्यांपासून ते पाळीव प्राण्यांपर्यंत JioTag Air कोणत्याही गोष्टींवर लावता येते आणि त्यांचा मागोवा घेता येतो.

जगभरात कव्हरेज: JioTag Air Find My नेटवर्कसोबतही काम करते जे तुमच्या वस्तूंचा जगाच्या कुठल्याही कोपऱ्यातून शोधण्यास मदत करते. Android वापरणारे वापरकर्ते JioThings अॅप वापरू शकतात.

मोठा अलर्ट आवाज : 120 dB चा मोठा आवाज असल्याने जवळपासच्या वस्तूंचा शोध घेणे सोपे होते.

ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी: JioTag Air नवीनतम ब्लूटूथ v5.3 वापरते जे सोप्या कनेक्टिव्हिटी आणि 12 महिन्यांची बॅटरी लाइफ देते. त्याबरोबर एक अतिरिक्त बॅटरी देखील मिळते.

सुरक्षा आणि अलर्ट: JioTag Air डिस्कनेक्शन अलर्ट देते जेणेकरून तुम्ही तुमची वस्तू कुठेही विसरलात तर तुम्हाला कळवले जाईल. Lost Mode चालू केल्यावर तुमची वस्तू जेव्हा एखाद्या Apple Find My नेटवर्कच्या डिव्हाइसने शोधली जाते तेव्हा तुम्हाला सूचना मिळेल.

शेअर करणे सोपे: JioTag Air ची वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही अॅपल Find My वर तुमच्या वस्तू इतर अॅपल वापरणार्‍यांसोबत शेअर करू शकता जेणेकरून ते देखील त्यांच्यावर नजर ठेवू शकतील.

JioTag Air ची किंमत आणि उपलब्धता

JioTag Air ची किंमत फक्त ₹ 1,499 आहे आणि ती Reliance Digital ची वेबसाइट, JioMart आणि Amazon वर उपलब्ध आहे. किफायतशीर असूनही दमदार वैशिष्ट्ये असलेली JioTag Air AirTag ची उत्तम पर्याय आहे.

हे प्रत्येकासाठी परवडणारे आहे.अगदी कमी किंमतीत तुम्ही तुमच्या कोणत्याही वस्तूंवर नजर ठेऊ शकता आणि वस्तु हरवण्यापासून वाचवू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Elections: 'एम' फॅक्टरचा कौल MVAच्या बाजूने, सर्वात मोठ्या संघटनेच्या पाठिंब्यानं बळ वाढलं, महायुतीला टेन्शन

Mohammad Shami ने ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी ठोकली दावेदारी; गोलंदाजीनंतर फलंदाजीतही दाखवली चमक

Goa Tourism : जाऊ फुलपाखरांच्या गावा! गोव्यात बटरफ्लाय कंझर्व्हेटरीला नक्की भेट द्या, फि,वेळ आणि ठिकाण जाणून घ्या सर्वकाही

Vinod Tawde : अजित पवारांना सोबत घेतल्याचे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी स्पष्टच सांगितले कारण...

Vinod Tawde: पुन्हा शरद पवार पावसात भिजले; भाजपचे तावडे म्हणाले, हा जिंकण्याचा 'भ्रम'...

SCROLL FOR NEXT