Jio Happy New Year 2022 Prepaid Plan esakal
विज्ञान-तंत्र

Jio चा 'हॅपी न्यू इयर 2022' प्लॅन, 365 दिवस मिळाणार खास बेनिफिट्स

सकाळ डिजिटल टीम

Jio Happy New Year 2022 plan : नवीन वर्ष 2022 येत आहे आणि त्याच्या सेलिब्रेशनच्या आधीच जिओने आपल्या ग्राहकांना एक अनोखी भेट दिली आहे. जिओने आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन प्रीपेड प्लॅन आणला असून या प्रीपेड प्लॅनला 'Jio Happy New Year 2022' ऑफर असे म्हटले जाते. या प्लॅनमध्ये काय खास आहे, किंमत किती आहे आणि काय फायदे आहेत, सर्व काही जाणून घ्या.

जिओने हॅपी न्यू इयर 2022 ऑफर सादर केली आहे, ज्याची किंमत 2545 रुपये असून यामध्ये तुम्हाला 365 दिवसांची वैधता येते, ज्यामध्ये ग्राहकांना दररोज 1.5GB डेटा मिळेल. म्हणजेच जे ग्राहक हा प्लॅन निवडतात, त्यांना एका वर्षात एकूण 547.5GB डेटा मिळेल. मात्र, एकदा 1.5GB डेटाची दिवसाची मर्यादा संपली की, इंटरनेटचा वेग 64KBps होईल. याशिवाय, जिओ हॅपी न्यू इयर 2022 प्लॅनमध्ये अमर्यादित व्हॉइस कॉल्स, दररोज 100 एसएमएस आणि Jio अॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन, ज्यात Jio TV, Jio Cinema, JioSecurity आणि JioCloud यांचा समावेश आहे. तसेच हा प्लॅन आता वापरकर्त्यांना 336 दिवसांच्या व्हॅलिडिटी ऐवजी 29 दिवसांची अतिरिक्त व्हॅलिडिटी देईल म्हणजेच पूर्ण 365 दिवसांची व्हॅलिडिटी आता या प्लॅनसोबत दिली जात आहे. ही Jio ऑफर मर्यादित कालावधीसाठीची ऑफर आहे आणि ही ऑफर किती काळ लाइव्ह असेल आणि या प्लॅनची ​​किंमत आणि फायदे काय आहेत, याबद्दल आपण जाणून घेऊया.

ऑफर किती दिवसांपर्यंत लाईव्ह आहे?

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही ऑफर किती दिवस लाइव्ह असेल, तर या ऑफरचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला या प्लॅनचा रीचार्ज 2 जानेवारी 2022 करावा लागेल कारण ही ऑफर फक्त 2 जानेवारीपर्यंत लाइव्ह असेल. अतिरिक्त व्हॅलिडिटी सोबत या प्लॅनमध्ये कोणताही बदल झालेला नाही.

Jio चा 2545 रुपयांचा प्लॅन

या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना दररोज 1.5 GB डेटासह कोणत्याही नेटवर्कवर अनलिमीटेड व्हॉइस कॉलिंग सुविधेसह दररोज 100 SMS दिले जात आहेत. रिलायन्स जिओने देखील माहिती दिली आहे की 29 दिवसांची अतिरिक्त वैधता वापरकर्त्यांना जानेवारी 2022 मध्येच क्रेडिट केली जाईल. इतर कंपन्यांशी तुलना केल्यास प्लॅनची ​​तुलना केली तर अतिरिक्त वैधतेमुळे, आता रिलायन्स जिओचा हा प्लॅन खूप फायदेशीर ठरणारा आहे. कारण 365 दिवसांची वैधता ऑफर करणार्‍या इतर दूरसंचार कंपन्यांच्या दररोज 1.5 GB डेटा ऑफर करणाऱ्या प्लॅनच्या किमती खूप जास्त आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात मतमोजणीला प्रत्यक्ष साडे आठ वाजता सुरुवात होणार

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: दहिसर मतदान केंद्रात निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार

Maharashtra Assemble Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT