Jio Bharat J1 Mobile esakal
विज्ञान-तंत्र

Jio Bharat J1 Mobile : जिओची धमाकेदार एन्ट्री! 4G कीपॅड स्मार्टफोनची एक झलक पाहाच; जबरदस्त फीचर्स अन् किंमत पाहून लगेचच खरेदी कराल

Jio Bharat J1 Feature Phone : जियोने त्यांचा नवा फीचर फोन JioBharat J1 लॉंच कीपॅड स्मार्ट मोबाईल लॉंच केला आहे. याचे फीचर्स आणि किंमत खूपच आकर्षक आहे.

Saisimran Ghashi

Jio New Keypad Mobile : भारतातील बजेट स्मार्टफोनच्या युद्धात आता अनेक फीचर फोन दमदार एंट्री घेत आहेत. अश्यात जियोने त्यांचा नवा फीचर फोन JioBharat J1 लॉंच करून स्मार्टफोन बाजारात खळबळ उडवली आहे. केवळ दोन हजार रुपयांपेक्षा कमी किमतीपासून सुरु असलेल्या या फोनमध्ये स्मार्टफोनसारखेच अनेक फीचर्स आहेत.

या फोनमध्ये तुम्हाला यूपीआय पेमेंट, लाइव्ह टीव्ही, 4G व्हॉइस कॉलिंगसारखे जबरदस्त फीचर्स मिळणार आहेत. म्हणजेच, तुम्ही तुमचा फोन वापरून थेट पैसे पाठवू शकता, आणि आवडते टीव्ही शोही पाहू शकता. याशिवाय फोनमध्ये २.८ इंचाची मोठी स्क्रीन, ३.५ मिमीचा हेडफोन जॅक, २५०० mAh ची बॅटरी आणि १२८ जीबी पर्यंत स्टोरेज वाढवण्याची सुविधा आहे.

जियोने या फोनसाठी १२३ रुपयांचा स्पेशल रिचार्ज प्लॅनही काढला आहे. यामध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंग, १४ जीबी डेटा आणि २८ दिवसांची वैधता मिळेल. या फोनची खासियत म्हणजे तो २३ भारतीय भाषांमध्ये उपलब्ध आहे. म्हणजेच, कोणत्याही भाषेतील वापरकर्ता सहजपणे या फोनचा वापर करू शकतो.

या मोबाईलची विशेष बाब हा टच स्क्रीन स्मार्टफोन नसून कीपॅड मोबाईल आहे. जो कोणीही सहजपणे वापरू शकतो.

जियो भारत J1 फोन अमेझॉन, रिलायन्स डिजिटल आणि जियोमार्टवर विक्रीसाठी उपलब्ध आहे. या फोनच्या लॉन्चमुळे बजेट स्मार्टफोन बाजारात कसली स्पर्धा निर्माण होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे

जिओने जुलै महिन्याच्या सुरुवातीला मोबाईल रीचार्जमध्ये दरवाढ केल्याने ग्राहकवर्गातून प्रचंड नाराजी व्यक्त केली गेली. असंख्य लोकांनी त्यांचे सिमकार्ड अन्य नेटवर्क मध्ये पोर्ट करून घेतले. अश्यात जिओने लॉंच केलेल्या या मोबाईलला ग्राहक वर्गातून किती प्रतिसाद मिळतो हे पाहाण्यासारखे असेल. 2017 मध्ये जिओने त्यांचा असाच एक फीचर फोन लॉंच केला होता. ग्राहक वर्गाकडून त्याला चांगला प्रतिसाद मिळाला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Closing: शेअर बाजार कोसळला; सेन्सेक्स 900 अंकांनी खाली, गुंतवणूकदारांचे 8.50 लाख कोटी रुपयांचे नुकसान

Latest Maharashtra News Updates Live : पुण्यात आचारसंहिता भंगाच्या ७१ तक्रारींची नोंद

IND vs NZ: केएल राहुलला मिळणार डच्चू अन् पुणे कसोटीत Shubman Gill करणार पुनरागमन? कोच म्हणाले...

Dr. Jayashree Thorat : वडिलांवर बोलाल तर तुमची जागा दाखवू ,संगमनेरमध्ये दडपशाही चालणार नाही

Diwali Recipe : गोड नेहमीच बनवताय, यंदा खारी शंकरपाळी ट्राय करा, फराळाची चवच बदलेल

SCROLL FOR NEXT