Jio Sakal
विज्ञान-तंत्र

Mobile Recharge: Jio कडे आहे अवघ्या १५ रुपयांचा रिचार्ज प्लॅन, मिळेल हाय-स्पीड डेटाचा फायदा; पाहा बेनिफिट्स

टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओकडे १०० रुपयांच्या बजेटमध्ये येणारे अनेक शानदार रिचार्ज प्लॅन्स उपलब्ध आहेत. कंपनीच्या प्लॅनमध्ये डेटा-कॉलिंगचा फायदा मिळेल.

सकाळ डिजिटल टीम

Reliance Jio Mobile Recharge: टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ यूजर्ससाठी कमी किंमतीत जास्त बेनिफिट्स देणारे प्लॅन्स लाँच करत असते. कंपनीकडे प्रत्येक यूजर्सच्या गरजेनुसार प्लॅन्स उपलब्ध आहेत. तुम्ही जर १०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत येणारे प्लॅन्स शोधत असाल तर जिओकडे अनेक चांगले रिचार्ज प्लॅन्स उपलब्ध आहेत. या प्लॅन्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.

हेही वाचाः Credit Score: असा वाढवा तुमचा ‘क्रेडिट स्कोअर’

जिओचा १५ रुपयांचा रिचार्ज प्लॅन

Jio कडे अवघ्या १५ रुपयांचा रिचार्ज प्लॅन उपलब्ध आहे. तुम्ही जर दररोज जास्त डेटा वापरत असाल तर हा प्लॅन तुमच्या उपयोगी येईल. तुमच्या नियमित प्लॅनमध्ये येणारा १ जीबी, १.५ जीबी आणि २ जीबी डेटा समाप्त झाल्यास १५ रुपयांच्या प्लॅनचा फायदा घेऊ शकता. या डेटा अ‍ॅड ऑन प्लॅनमध्ये तुम्हाला १ जीबी डेटा मिळेल. याची वैधता तुमच्या नियमित प्लॅन एवढी असेल. मात्र, लक्षात घ्या की यामध्ये मेसेज आणि कॉलिंगची सुविधा मिळत नाही.

जिओचा ७५ रुपयांचा रिचार्ज प्लॅन

जिओकडे ७५ रुपयांचा स्वस्त प्लॅन उपलब्ध असून, यात डेटा-कॉलिंगचा फायदा मिळेल. जिओच्या ७५ रुपयांच्या प्लॅनची वैधता २३ दिवस आहे. प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज १०० एमबी डेटा दिला जातो. तसेच, अतिरिक्त २०० एमबी डेटाचा देखील फायदा मिळेल. प्लॅनमध्ये डेटा समाप्त झाल्यास ६४ केबीपीएसच्या स्पीडने इंटरनेट वापरू शकता.

या रिचार्जमध्ये देशभरात सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड वॉइस कॉलिंग आणि ५० एसएमएसची सुविधा दिली जाते. इतर बेनिफिट्सबद्दल सांगायचे तर यामध्ये जिओ टीव्ही, जिओ सिनेमा, जिओ क्लाउड आणि जिओ सिक्योरिटीचे फ्री सबस्क्रिप्शन मिळेल. परंतु, लक्षात घ्या की हा केवळ जिओफोन प्लॅन आहे. म्हणजेच, तुमच्याकडे केवळ जिओफोन असल्यावरच या प्लॅनचा फायदा घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral News: ..आणि चितेवरील पार्थिव उठले, स्मशानभूमीत झाला गोंधळ ! तीन डॉक्टर निलंबित, काय घडलं नेमकं?

Latest Maharashtra News Updates : अजित पवार रेकॉर्डब्रेक मताधिक्यानं जिंकणार - सूरज चव्हाण

Ulhasnagar Crime : उल्हासनगरातील 'त्या' चिमुकलीची मामानेच हत्या केल्याचा उलगडा

Phulambri Assembly Election Voting : मतांच्या विभाजनावर ठरणार उमेदवारांचे भवितव्य..!

Mahim Constituency: 'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

SCROLL FOR NEXT