Jio Sakal
विज्ञान-तंत्र

Mobile Recharge: Airtel-Vi ची उडाली झोप! Jio चा खूपच स्वस्त प्लॅन लाँच, ५०GB डेटाचा मिळेल फायदा

टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने २२२ रुपये किंमतीचा शानदार रिचार्ज प्लॅन लाँच केला आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला ५० जीबी डेटा मिळेल.

सकाळ डिजिटल टीम

Jio New Recharge Plan: देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी Reliance Jio ने ग्राहकांसाठी नवीन प्रीपेड प्लॅन लाँच केला आहे. या प्रीपेड प्लॅनची किंमत फक्त २२२ रुपये आहे. या प्लॅनला 'फुटबॉल वर्ल्ड कप डेटा पॅक' असे नाव दिले असून, यावरूनच स्पष्ट होते की हा केवळ डेटा प्लॅन आहे. Reliance Jio च्या या नवीन प्लॅनमध्ये मिळणाऱ्या बेनिफिट्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.

हेही वाचा- Sextortion: भारत ही सेक्सटॉर्शनची जागतिक राजधानी होतेय का?

Reliance Jio चा २२२ रुपयांचा प्रीपेड प्लॅन

Reliance Jio च्या २२२ रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये तुम्हाला एकूण ५० जीबी हाय-स्पीड डेटा मिळतो. या प्लॅनची वैधता ३० दिवस आहे. तुम्हाला जर मोबाइलवर फीफा वर्ल्ड कपमधील सामन्यांचा आनंद घ्यायचा असेल अथवा चित्रपट-सीरिज पाहायची असल्यास हा प्लॅन तुमच्या फायद्याचा ठरेल. ५० जीबी डेटा समाप्त झाल्यास तुम्ही ६४ केबीपीएसच्या स्पीडने इंटरनेट वापरू शकता.

जिओच्या या नवीन प्लॅनमध्ये ५० जीबी डेटा मिळतो. अशाप्रकारे, तुम्हाला १ जीबी डेटासाठी फक्त ४.४४ रुपये खर्च करावे लागतील. परंतु, तुम्ही दररोज १ जीबी डेटा ऑफर करणारा प्लॅन घेतल्यास १५ रुपये आणि दररोज २ जीबी डेटा ऑफर करणारा प्लॅन घेतल्यास २५ रुपये खर्च येतो. त्यामुळे २२२ रुपयांचा प्लॅन फायद्याचा ठरतो.

Airtel चा २३९ रुपयांचा प्रीपेड प्लॅन

Airtel च्या २३९ रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये दररोज १ जीबी डेटा मिळतो. या प्लॅनची वैधता २४ दिवस आहे. यामध्ये अनलिमिटेड वॉइस कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएस देखील मिळतात. तसेच, फ्री Hellotunes, Wynk Music आणि FASTag रिचार्जवर १०० रुपये कॅशबॅकचा फायदा मिळेल.

Vodafone Idea चा २३९ रुपयांचा प्रीपेड प्लॅन

Vodafone Idea च्या २३९ रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज १ जीबी डेटाचा फायदा मिळेल. प्लॅनची वैधता २४ दिवस आहे. तसेच, अनलिमिटेड वॉइस कॉलिंग आणि दररोज १०० मोफत एसएमएसी सुविधा मिळेल. हाय-स्पीड डेटा समाप्त झाल्यावर ६४Kbps च्या स्पीडने इंटरनेट वापरता येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aheri Assembly Election Results 2024 : बापाने केला लेकीचा पराभव! अहेरी मतदारसंघात धर्मरावबाबा आत्राम यांनी मारली बाजी

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मालेगावमतदार संघात शिवसेनेचे उमेदवार दादा भुसे १ लाख ६ हजार ००६ मतांनी विजयी

khadakwasla Assembly Election 2024 Result Live: खडकवासलात भाजपचा विजयाचा चौकार, भीमराव तापकीर यांनी पुन्हा मारली बाजी

Rajan Naik Nalasopara Assembly Election 2024 Result : नालासोपाऱ्याचा गड भाजपचाच; राजन नाईक यांचा दणदणीत विजय

Dapoli Assembly Election 2024 Results : दापोलीत आमदार योगेश कदमांनी राखला गड; ठाकरे गटाच्या संजय कदमांचा केला पराभव

SCROLL FOR NEXT