दिग्गज दूरसंचार कंपन्या रिलायन्स जिओ(Jio) , व्होडाफोन-आयडिया (Vi) आणि एअरटेल (Airtel) तुम्हाला दररोज 2GB डेटासह अनेक प्लॅन देतात. ज्यामध्ये तुमच्या सर्व गरजा पुरवल्या जातात. आज आपण तिन्ही कंपन्यांच्या (रिलायन्स जिओ, एअरटेल आणि व्ही) सर्वात स्वस्त 2 जीबी डेटा प्लॅनबद्दल जाणून घेणार आहोत.
Reliance Jio : 7.8 रुपयांमध्ये प्रतिदिन 2 GB डेटा
हा दीर्घ वैधता आणि प्रतिदिन 2 GB डेटा ऑफर करणाऱ्या रिलायन्स जिओच्या प्लॅनपैकी एक आहे. कंपनी 2879 रुपयांमध्ये 365 दिवसांची वैधता देते. म्हणजेच एका दिवसाचा खर्च 7.8 रुपये आहे. प्लॅनमध्ये दररोज 2 जीबी डेटा दिला जातो. अशा प्रकारे एकूण डेटा 730 GB मिळेल. यासोबतच ग्राहकांना सर्व नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस देखील दिले जातात. प्लॅनमध्ये जिओ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शनही दिले जाते.
व्होडाफोन आयडिया (Vi) : 9.6 रुपयांमध्ये दररोज 2 GB डेटा
Vodafone-idea कडे दररोज 2 GB डेटासह मर्यादित प्लॅन आहेत. यापैकी एक प्लॅन 539 रुपयांचा आहे, ज्यामध्ये 56 दिवसांची वैधता उपलब्ध आहे. अशा प्रकारे एका दिवसाचा खर्च 9.6 रुपये आहे. प्लॅनमध्ये एकूण 112 जीबी डेटा, सर्व नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस देखील दिले जातात. याशिवाय, Binge All Night, Weekend Data Rollover, Data Delight आणि Vi Movies & TV Classic मध्ये मोफत एक्सेस दिला जातो.
Airtel : 8.2 रुपयांमध्ये प्रतिदिन 2 GB डेटा
Airtel च्या या प्लॅनची किंमत 2,999 रुपये आहे, ज्यामध्ये 365 दिवसांची वैधता उपलब्ध आहे. म्हणजेच एका दिवसाचा खर्च 8.2 रुपये होतो. प्लॅनमध्ये दररोज 2 जीबी डेटा दिला जातो. अशा प्रकारे एकूण डेटा 730 GB मिळेल. यासोबतच ग्राहकांना सर्व नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस देखील दिले जातात. ग्राहकांना डिस्ने+ हॉटस्टार, प्राइम व्हिडिओ मोबाइल एडिशन, फ्री हॅलोट्यून्स आणि विंक म्युझिक फ्री यासारखी सब्ससिक्रिप्शन मिळते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.