remove china app 
विज्ञान-तंत्र

‘रिमुव्ह चायना ॲप’ गुगल प्ले स्टोअरवरून हटवले 

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली, ता. ३ (पीटीआय) : कोरोना विषाणूचा उद्रेक त्यापाठोपाठ सीमेवर वाढलेला तणाव यामुळे चीनविरोधात देशभर असंतोष खदखदतो आहे. विविध ॲपच्या माध्यमातून भारताच्या डिजिटल विश्‍वावर हुकूमत गाजविणाऱ्या चीनला धडा शिकवण्यासाठी सेलिब्रेटींप्रमाणेच सर्वसामान्य भारतीयांनी देखील कंबर कसत चिनी ॲपवर बहिष्कार घालायला सुरवात केली होती. लोकप्रिय चिनी ॲप्सना शोधून ते डिलिट करण्यास मदत करणाऱ्या भारतीय बनावटीच्या ‘रिमुव्ह चायना ॲप’ या ॲपलाच गुगलने त्याच्या ॲप स्टोअरमधून बाहेरचा रस्ता दाखविला आहे.

चिनी अॅप्स रिमू्व्ह करणाऱ्या या भारतीय ॲपमुळे कंपनीच्या धोरणाचा भंग होत असल्याचा दावा गुगलच्या प्रवक्त्याने केला आहे. मागील महिन्यात ५० लाखांपेक्षाही अधिक लोकांनी हे ॲप डाउनलोड केले होते. या अॅपचा वापर करून युजर्सनी चिनी अॅप डिलीट केले आहेत. फोनमध्ये कोणतेच चायनिज अॅप्लिकेशन नसल्याचं नोटिफिकेशनही दिलं जात होतं.

थर्ड पार्टीने तयार केलेले ॲप हे डिलिट करण्याबाबत रिपोर्ट केल्यामुळे अॅप डिलिट केलं गेल्याची शक्यता आहे. एखाद्या ॲपबाबत दिशाभूल करणारी माहिती देणे हे गुगलच्या धोरणाविरोधात असल्याने त्यांनी हे ॲप डिलिट केले असावे असा संशय तंत्रज्ञानक्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केला आहे. गुगलकडून याबाबत अद्याप कोणती प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. 

‘वन टच ॲप लॅब्ज’या कंपनीने हे ॲप तयार केले होते, तिनेही गुगलच्या कारवाईवर भाष्य करण्यास नकार दिला आहे. आमचे ॲप हे आता हटविण्यात आले असून युजर्संच्या पाठिंब्याबद्दल त्यांचे आभार असे या कंपनीने संकेतस्थळावरील निवेदनात म्हटले आहे. 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SA: संजू सॅमसनची Century! ट्वेंटी-२०त विराट-रोहितच काय, तर एकाही भारतीयाला नाही जमलाय हा विक्रम

Assembly Election 2024 : पालघर जिल्ह्यात भाजपाला मोठा धक्का; कुणबी सेनेचा बहुजन विकास आघाडीला पाठिंबा

Champions Trophy 2025 : BCCI पाकिस्तानात न जाण्यावर ठाम; PCB म्हणते लेखी द्या, मग बघतोच...! IND vs PAK यांच्यात 'वॉर' जोरदार

SA vs IND T20I: अन् सूर्याच्या टीम इंडियानं राष्ट्रगीताचा अपमान होऊ दिला नाही; साऊंड बंद झाला, पण...

Trending News: अरे ये कैसा हुआ रे बाबा ! नवरा-बायकोचं भांडण अन् रेल्वेला लागला तीन कोटींचा चुना

SCROLL FOR NEXT