Republic Day Sale esakal
विज्ञान-तंत्र

Republic Day Sale : Vivo च्या फॅन मंडळींसाठी खुशखबर, रंग बदलणाऱ्या या फोनवर हजारोंची सूट

प्रजासत्ताक दिनाच्या या खास प्रसंगी विवो कंपनी ग्राहकांना स्मार्टफोनवर देत आहे उत्तम ऑफर

सकाळ डिजिटल टीम

Republic Day Sale : जर तुम्हालाही विवो मोबाईल स्वस्तात विकत घ्यायचा असेल तर खुशखबर आहे, प्रजासत्ताक दिनाच्या या खास प्रसंगी कंपनी ग्राहकांना त्यांच्या स्मार्टफोनवर उत्तम ऑफर देत आहे. विवोने नुकताच लोकप्रिय स्मार्टफोन ब्रँडच्या यादीत याने दुसरे स्थान प्राप्त केले आहे. कंपनी आपल्या Vivo V सीरीज आणि Vivo Y सीरीजच्या स्मार्टफोन्सवर मोठ्या प्रमाणात सूट देत आहे . यासाठी आधी जाणून घ्या कोणत्या मॉडेलवर तुम्ही किती पैसे वाचवू शकता.

Vivo V25 Pro ची भारतात किंमत

या हँडसेटवर उपलब्ध असलेल्या ऑफरबद्दल बोलायचे झाले तर, या डिव्हाइसवर तुम्हाला 2500 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक मिळू शकतो. पण कॅशबॅक मिळवण्यासाठी, तुम्ही ICICI (क्रेडिट कार्ड EMI, डेबिट कार्ड EMI) आणि SBI क्रेडिट कार्ड EMI आणि कोटक बँक क्रेडिट कार्डसह इतर बँक कार्ड्सचा लाभ घेऊ शकता. विशेष म्हणजे विवोकंपनीचा flagship समजला जाणारा हा फोन कलर चेंजिंग बॅक पॅनल सह येणारा मोबाईल आहे. या उपकरणाची किंमत 35 हजार 999 रुपयांपासून सुरू होते जी 41 हजार 999 रुपयांपर्यंत जाते.

Vivo V25 ची भारतातील किंमत आणि Vivo Y75 4G ची भारतात किंमत

ICICI आणि SBI क्रेडिट कार्ड EMI सह इतर बँक कार्ड वापरण्यावर रु. 2,000 चा कॅशबॅक दिला जात आहे. Vivo V25 ची किंमत 27 हजार 999 रुपयांपासून सुरू होते जी 31 हजार 999 रुपयांपर्यंत जाते. त्याच वेळी, Vivo Y75 4G मॉडेलची किंमत 19 हजार 990 रुपये आहे.

Vivo Y35 ची भारतात किंमत

या Vivo मोबाईल फोनवर तुम्ही ICICI (क्रेडिट कार्ड EMI/फुल स्वाइप/डेबिट कार्ड EMI) आणि SBI क्रेडिट कार्ड EMI सह इतर बँक कार्ड वापरून रु. 1,000 पर्यंतचा कॅशबॅक मिळवू शकता. या Vivo मोबाईल फोनची किंमत 18 हजार 499 रुपये आहे, या किंमतीत तुम्हाला 8 GB RAM/ 128 GB स्टोरेज व्हेरिएंट मिळेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT