Climate Crisis Causes Longer Earth Days esakal
विज्ञान-तंत्र

Climate Change Effect : हवामान बदलामुळे पृथ्वीची गती मंदावली! आता दिवसाच्या लांबीवर नेमका काय होणार परिणाम?

Saisimran Ghashi

Longer Day on Earth : हवामान बदलामुळे ध्रुवीय प्रदेशातील बर्फ वितळत चालला असून त्याचा परिणाम पृथ्वीच्या फिरण्याच्या गतीवर होत आहे. अलीकडे झालेल्या संशोधनानुसार, पृथ्वीच्या फिरण्याची गती कमी होत चालली आहे, त्यामुळे दिवसांची लांबी वाढत आहे. एवढ्या गतीने लांबी वाढण्याचे प्रमाण आत्तापर्यंत कधीच पाहिले गेले नाहीये.

अमेरिकेच्या राष्ट्रीय विज्ञान अकॅडमीच्या (National Science Academy) नियतकालिकात प्रकाशित झालेल्या या संशोधनात अत्याधुनिक निरीक्षण तंत्राचा वापर करण्यात आला आहे. यामध्ये पृथ्वीच्या फिरण्याची अतिशय बारकाईने मापन करण्यासाठी 'व्हरी लॉंग बेसलाईन इंटरफेरोमेट्री' आणि 'ग्लोबल पोजिशनिंग सिस्टीम' यांचा समावेश केला होता.

संशोधनात सहभागी असलेले बेनेडिक्ट सोजा यांनी सांगितले की, ग्रीनलँड आणि अंटार्क्टिका येथील बर्फ वितळून त्याचे पाणी विषुववृत्त प्रदेशाकडे येत आहेत. त्यामुळे पृथ्वीच्या मध्यभागी असलेल्या वस्तुमानापेक्षा विषुववृत्त प्रदेशाचे वस्तुमान वाढत आहे. हे वाढणारे वस्तुमान हे पृथ्वीच्या फिरण्यावर परिणाम करत असून ते कमी होत चालले आहे. याचे थेट परिणाम म्हणजे दिवसांची लांबी वाढत आहे. हे प्रमाण जरी अगदी थोडे असले तरी त्याचा दीर्घकालीन परिणाम पृथ्वीच्या वातावरणावर होणार आहे.

दिवसाची लांबी वाढल्याने नक्कीच पृथ्वी चक्रावर परिणाम होणार आहे. याचा परिणाम मानवांवर देखील होणार आहे. यापूर्वी झालेल्या संशोधनामध्ये पृथ्वीच्या आतील गाभा फिरण्याची गती कमी झाल्यामुळे दिवसांच्या लांबीवर परिणाम होत असून पशूपक्षांवर देखील याचा परिणाम झाल्याचे दिसले. आता त्यानंतर या नव्या संशोधनामुळे हवामान बदलामुळे ध्रुवीय प्रदेशातील बर्फ वितळत चालला असून त्याचा परिणाम दिसच्या लांबीवर होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT