Neuroscientists Discover How the Brain Predicts Future Actions esakal
विज्ञान-तंत्र

Brain Predictive Power : मेंदूमध्ये सतत का चालतात भविष्याच्या कल्पना? संशोधनातून समोर आली आश्चर्यकारक माहिती, जाणून घ्या

Saisimran Ghashi

Brain Power : आपण एखादा निर्णय घेण्यापूर्वी त्याचे परिणाम काय होतील याची कल्पना करतो. हा आपल्या सर्वांसाठी सवयीचाच प्रकार आहे. पण ब्रेनमध्ये नेमकं काय चालत असतं आणि निर्णय घेण्याआधी आपल्याला भविष्याची कल्पना का येते याचा उलगडा आता नव्या संशोधनामुळे झाला आहे. यामुळे निर्णय घेण्याच्या क्षमतेवर परिणाम करणाऱ्या आजारांवर उपचार करण्यासाठी नवे मार्ग सापडू शकतात.

संशोधकांनी केलेल्या अभ्यासात असे दिसून आले आहे की, नियोजन आणि निर्णय घेण्यासाठी महत्वाची भूमिका बजावणारी प्रीफ्रंटल कॉर्टेक्स आणि स्मृती तयार करण्यासाठी आणि साठवण्यासाठी मदत करणारी हिप्पोकॅम्पस यांच्यामधल्या संवादामुळे आपल्याला निर्णय घेण्यापूर्वी त्याचे परिणाम दिसतात. जसे एखादा बुद्धीबळ खेळाडू चाल करण्याआधी त्याच्या पुढच्या काही चालांची कल्पना करतो, त्याचप्रमाणे आपणही निर्णय घेण्याआधी त्याचे परिणाम डोक्यासमोर आणतो.

संशोधनाचे प्रमुख लेखक न्यूयॉर्क विद्यापीठाच्या मानसशास्त्र विभागातील सहाय्यक प्राध्यापक मार्सेलो मॅटर यांनी सांगितले की, "प्रीफ्रंटल कॉर्टेक्स ही एक प्रकारची 'सिम्युलेटर' आहे. ही हिप्पोकॅम्पसमध्ये साठवलेल्या माहितीचा वापर करून शक्य असलेल्या कृतींचे मानसिक परीक्षण करते."

"हे संशोधन नियोजनाच्या न्यूरल आणि कॉग्निटिव्ह मेकेनिज्मवर प्रकाश टाकते. नियोजन ही मानवी आणि प्राणी म्हणून आपल्या बुद्धिमत्तेचा एक महत्वाचा भाग आहे. या मेंदूच्या कार्यपद्धतींबद्दल अधिक समज निर्माण झाल्यास निर्णय घेण्याच्या क्षमतेवर परिणाम करणाऱ्या आजारांवर उपचार करण्यासाठी नवे मार्ग उपलब्ध होऊ शकतात," असेही मॅटर म्हणाले.

हे संशोधन 'नेचर न्यूरोसायन्स' या जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहे. या अभ्यासासाठी संशोधकांनी नियोजन करताना मेंदूच्या क्रियाकलापाचा अंदाज लावणारे एक मॉडेल तयार केले. या मॉडेलला मानव आणि प्रयोगशाळेतील उंदरांकडून मिळालेल्या डेटावर आधारित तपासण्यात आले. हे मॉडेल कृत्रिम बुद्धिमत्तेच्या अल्गोरिदमवर आधारित होते जे दिलेल्या माहितीच्या आधारे जटिल नमुने शिकते.

हे मॉडेल प्रीफ्रंटल कॉर्टेक्स आणि हिप्पोकॅम्पस यांच्यामधल्या संवादासाठी अनुकरण करून "शक्य असलेल्या भविष्याची कल्पना" करत होते. संशोधकांनी असे स्पष्ट केले की, ही न्यूरल प्रक्रिया आपल्याला बदलत्या वातावरणाशी जलद जुळवून घेण्यास मदत करते. उदाहरणार्थ, रस्ता बंद असल्याचे आढळल्यावर आपण दुसऱ्या मार्गाने जाण्याचा निर्णय घेतो.

हे मॉडेल मानवी वर्तणुकांचे किती चांगले अंदाज लावते याची चाचणी करण्यासाठी, संशोधकांनी लोकांना ऑनलाइन मेझद्वारे नेले. यावेळी प्रत्येक पाऊल टाकण्याआधी ते किती वेळ विचार करतात यावरही लक्ष दिले गेले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तो जगला, तरच देश जगेल

कृषिक्षेत्र आधुनिकतेच्या दिशेनं

जातिनिहाय जनगणनेची अपरिहार्यता

निवडणूक काश्मीरची; परीक्षा केंद्राची

संघ भाजपच्या मदतीला येणार...

SCROLL FOR NEXT