researchers develop new ai model that can tell individuals age from chest x ray Sakal
विज्ञान-तंत्र

AI Model : छातीच्या ‘एक्स रे’ वरून कळणार वय; कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) मदतीने नवीन मॉडेल विकसित

यासंदर्भातील संशोधन ‘द लॅन्सेट हेल्दी लाँगेविटी’ या नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : शरीरातील विविध समस्यांचे निदान करण्यासाठी ‘एक्स रे’चा वापर केला जातो. मात्र, आता संशोधकांनी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने छातीच्या एक्स रे वरून संबंधित व्यक्तीच्या वयाचा अंदाज बांधू शकणारे नवीन मॉडेल विकसित केले आहे. यासंदर्भातील संशोधन ‘द लॅन्सेट हेल्दी लाँगेविटी’ या नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे. जपानमधील ओसाका मेट्रोपॉलिटन युनिव्हर्सिटीतील संशोधकांनी हे मॉडेल विकसित केले.

हे एक्स रे चे नवीन मॉडेल व्यक्तीच्या वयाबरोबरच उच्च रक्तदाब आणि ‘क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज’ सारख्या फुफ्फुसांच्या आजारांविषयीही सूचित करू शकते. कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित एक्स रेच्या मॉडेलने वैद्यकीय प्रतिमा प्रणालीत (मेडिकल इमेजिंग) मोठी झेप घेतली असून आजारांचे लवकर निदान होऊन वेळीच उपचार करण्याचा मार्गही मोकळा झाला आहे.

जपानमधील पाच संस्थांमध्ये एक्स रेच्या या मॉडेलची चाचणी घेण्यात आली. संशोधक यासुहितो मितसुयामा म्हणाले, की जागतिक लोकसंख्या वाढत असल्याने वय आणि दीर्घायुष्याशी संबंधित अशा प्रकारच्या संशोधनांचे महत्त्वही वाढत आहे.

वृद्धत्व ही अनेक आजारांशी संबंधित गुंतागुंतीची प्रक्रिया असून व्यक्तीपरत्वे त्याचे विविध परिणाम होतात. कालानुक्रमानुसार किंवा प्रत्यक्षातील वय हा सर्वांत महत्त्वाच्या घटकांपैकी एक आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित छातीच्या एक्स रे मुळे संबंधित व्यक्तीचे वय स्पष्टपणे समजू शकेल. त्याचप्रमाणे, आरोग्यविषयक माहितीही समजेल.

संशोधकांकडून २००८ ते २०२१ दरम्यान आरोग्य तपासणी करणाऱ्या सुमारे ३६,०५१ व्यक्तींचे ६७,१०० एक्स रे काढून कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित मॉडेल विकसित केले. यावेळी या एक्स रेने वर्तविलेला वयाचा अंदाज व व्यक्तीचे कालानुक्रमानुसार किंवा प्रत्यक्षातील वय यात नजीकचा सहसंबंध असल्याचेही संशोधकांना आढळले.

त्याचप्रमाणे या एक्स रेने वर्तविलेला वयाचा अंदाज व व्यक्तीचे वय यातील फरक उच्च रक्तदाब, सीओपीडी, हायपरयुरिसेमिया (रक्तातील युरिक ॲसिडची उच्च पातळी) आदींशी जवळचा संबंध असल्याचेही निदर्शनास आले. कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित एक्स रेने वर्तविलेले वय जेवढे अधिक तेवढे संबंधित व्यक्तीला वरील आजार होण्याची शक्यता अधिक आहे, असा याचा अर्थ असल्याचे संशोधकांनी स्पष्ट केले.

कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित एक्स-रे केवळ शरीरातील अवयव व हाडांची स्थितीच दर्शवीत नाही तर तो वय तसेच दीर्घायुष्याबाबत अंदाज वर्तविण्यासाठीही उपयुक्त ठरू शकतो. हे तंत्रज्ञान अधिक विकसित करून जुनाट आजारांच्या तिव्रतेचा तसेच आयुर्मानाचा अंदाज घेण्यासाठी ते वापरण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.

- यासुहितो मितसुयामा, संशोधक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Phulambri Assembly Election Voting : मतांच्या विभाजनावर ठरणार उमेदवारांचे भवितव्य..!

Mahim Constituency: 'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

IND vs AUS : ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी रचला इतिहास; एकत्रित ५०० विकेट्स घेणारे जगातले पहिलं गोलंदाजी युनीट

Kitchen Hacks : थंडीत भांडी घासायचं जीवावर येतंय? या सोप्या ट्रिक आजमवा, काम सोप्प होईल

Virat Kohli Video: कोहली चुकला, अन् कॅच सुटला! बुमराहसह टीम इंडियानं केलेली सेलिब्रेशनला सुरुवात, पण...

SCROLL FOR NEXT