Dodo Bird Esakal
विज्ञान-तंत्र

Dodo Bird : 350 वर्षांपूर्वी लुप्त झालेला डोडो पक्षी पुन्हा घेणार जन्म, जाणून घ्या कसं?

16 व्या शतकात या पक्ष्यांची मोठ्या प्रमाणात शिकार करण्यात आली, ज्यामुळे ते लुप्त झाले.

Sudesh

माणसांनी केलेलं प्रदूषण, शिकार आणि जंगलतोड यामुळे अनेक प्राणी आणि पक्ष्यांच्या प्रजाती नामशेष झाल्या आहेत. मात्र, आता संशोधक अशा नामशेष झालेल्या प्रजातींना पुन्हा जिवंत करण्याचा प्रयत्न करत आहे. याची सुरुवात 350 वर्षांपूर्वी नामशेष झालेल्या डोडो या पक्ष्यापासून होणार आहे. यासाठी मोठ्या स्तरावर संशोधन सुरू आहे.

इंग्रजी भाषेत एक म्हण आहे, 'डेड अ‍ॅज डोडो'. म्हणजेच, अगदी डोडो पक्षाप्रमाणे नामशेष झालेलं. मात्र, जर वैज्ञानिकांच्या प्रयत्नांना यश आले तर येत्या काळात ही म्हणच नामशेष होईल. अमेरिकन कंपनी कोलोसल बायोसायन्सचे शास्त्रज्ञ यासाठी काम करत आहेत, ही कंपनी जेनेटिक इंजिनिअरिंगवर काम करते.

असे नामषेश झाले डोडो

डोडो ही पक्ष्यांची एक अतिशय खास प्रजाती होती. हा मॉरिशसचा स्थानिक पक्षी होता. विशेष म्हणजे हा पक्षी असूनही तो उडू शकत नव्हता. त्यामुळेच हा पक्षी नामशेष होण्यास कारणीभूत ठरला. असं म्हणतात, की जेव्हा युरोपियन जहाजे 16 व्या शतकात प्रथमच मॉरिशसला पोहोचली, तेव्हा या पक्ष्यांची मोठ्या प्रमाणात शिकार करण्यात आली.

इतकी शिकार झाल्यामुळे लवकरच हे पक्षी संपले. ब्रिटॅनिका वेबसाइटवरील अहवालानुसार, 1681 मध्ये मॉरिशसमध्ये शेवटचा डोडो पक्षी दिसला होता. तेव्हापासून त्याचे अवशेष फक्त संग्रहालयात पाहायला मिळतात.

शास्त्रज्ञांसमोर मोठं आव्हान

नामशेष झालेल्या डोडोला परत आणण्यासाठी शास्त्रज्ञ डीएनए पेशींवर संशोधन करत आहेत. यासाठी शास्त्रज्ञ डोडोला परत आणू शकणारे जनुक शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. हे आव्हानात्मक आहे कारण कोणत्याही डीएनएमध्ये अनेक जनुके असतात जी त्या प्राण्याची ताकद, दिसणे, हावभाव आणि सवयी काय असतील हे ठरवतात. अशा जनुकांच्या मदतीनेच मानवाला त्यांच्या पालकांचे स्वरूप आणि सवयी प्राप्त होतात.

डोडोसारखा डीएनए तयार करण्याचा शास्त्रज्ञ प्रयत्न करत आहेत. या प्रकल्पावर काम करणार्‍या शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की डोडो हे निकोबारीज कबुतराच्या प्रजातीच्या जवळ जाणारे आहेत. त्यामुळे त्यावर अभ्यास सुरू आहे. या कबुतराच्या जनुकाचे संपादन करून नवीन डीएनए सेल तयार करून तो अंड्यामध्ये टाकला जाईल, जेणेकरून जन्माला आलेला पक्षी कबुतराच्या ऐवजी डोडोसारखा दिसेल.

क्लोनिंग नाही सोपं

प्रत्येक प्रजाती त्याच्या जनुकांद्वारे परिभाषित केली जाते, म्हणून नामशेष झालेल्या पक्ष्याला परत आणण्याचा एक मार्ग म्हणजे नामशेष झालेल्या प्राण्याचे संरक्षित डीएनए पक्ष्याच्या अंड्यामध्ये घालणे आणि ती अंडी पुन्हा पक्ष्यामध्ये रोपण करणे. या संपूर्ण प्रक्रियेला 'क्लोनिंग' म्हणतात.

परंतु, नामशेष झालेल्या पक्ष्यांच्या बाबतीत ते अवघड आहे. एखाद्या प्रजातीचे क्लोन बनवण्यासाठी तिच्या जिवंत पेशीची आवश्यकता असते. मात्र डोडोच्या बाबतीत असे होऊ शकत नाही, कारण ही प्रजाती 350 वर्षांपूर्वी नामशेष झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT