Romance Scam in India eSakal
विज्ञान-तंत्र

Romance Scam : भारतात वाढतोय 'रोमान्स स्कॅम', ऑनलाईन डेटिंगच्या नादात लाखो लोकांना लागतोय चुना!

Online Dating Scam : डेटिंग स्कॅमच्या पद्धतीत गेल्या काही वर्षांमध्ये बदल झाला असून, आता यासाठी एआय आणि इतर आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेतली जात असल्याचं या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.

Sudesh

Dating Scam in India : व्हॅलेंटाईन्स डे जवळ आलेला असताना कित्येक लोक ऑनलाईन डेटिंग करुन पार्टनर शोधत आहेत. मात्र याच वेळी एक धक्कादायक अहवाल समोर आला आहे. देशातील 66 टक्के लोक ऑनलाईन डेटिंग स्कॅमला बळी पडल्याचं या अहवालात म्हटलं आहे. यातील कित्येकांना एआयच्या मदतीने गंडवण्यात आलं आहे.

एक्सपोजर मॅनेजमेंट कंपनी असलेल्या टेनेबलने हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. डेटिंग स्कॅमच्या पद्धतीत गेल्या काही वर्षांमध्ये बदल झाला असून, आता यासाठी एआय आणि इतर आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेतली जात असल्याचं या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. (Online Scam)

डीपफेकची मदत

2023 या वर्षामध्ये 43 टक्के भारतीयांना एआय व्हॉईस स्कॅमने फसवण्यात आलं. सुमारे 83 टक्के लोकांची या माध्यमातून आर्थिक फसवणूक करण्यात आली. 69 टक्के भारतीयांनी हे कबूल केलं आहे, की ते एआय-जनरेटेड व्हॉईस आणि खऱ्या व्यक्तीचा आवाज यातील फरक ओळखू शकत नाहीत. याचाच फायदा स्कॅमर्स घेत आहेत. (Voice Deepfake)

फेसबुक-इन्स्टाचा वापर

बऱ्याच प्रकरणांमध्ये असं दिसून आलं आहे, की हे स्कॅम साधारणपणे फेसबुक किंवा इन्स्टाग्राम अशा सोशल मीडिया हँडल्सवरुन सुरू होतात. कित्येक वेळा स्कॅमर्स अशा लोकांना टार्गेट करतात जे वृद्ध आहेत, किंवा ज्यांना मेमरी लॉस ही समस्या आहे. केवळ सोशल मीडियाच नाही, तर डेटिंग अ‍ॅप्सवर देखील अशा प्रकारे ओळख करुन घेऊन मग पैसे मागण्याचा प्रकार होत आहे. (Dating Apps Scam)

कसा होतो स्कॅम?

स्कॅमर्स आधी डेटिंग साईट किंवा सोशल मीडिया साईटवर चॅटिंग करून समोरच्या व्यक्तीशी ओळख वाढवतात. त्यानंतर फोन नंबर, व्हॉट्सअ‍ॅप नंबर एक्सचेंज केले जातात. मग डीपफेकच्या मदतीने आपण फेक अकाउंट नसून, खरी व्यक्ती आहोत हे समोरच्या व्यक्तीला पटवून दिलं जातं. यानंतर काही कारण सांगून पैशांची मागणी केली जाते. ही सगळी प्रक्रिया अगदी टप्प्या-टप्प्याने केली जाते. त्यामुळे समोरच्या व्यक्तीला आपण फसवलो जात आहे याची जाणीव लवकर होत नाही. (Facebook Scam)

लिंक्सवर करु नका क्लिक्स

McAfee या संस्थेने केलेल्या एका रिसर्चनुसार, रोमान्स थीम असणाऱ्या स्पॅम ईमेल्सची संख्या 400 टक्क्यांनी वाढली आहे. 'व्हॅलेंटाईन्स डे'च्या निमित्ताने गिफ्ट आणि शॉपिंग ऑफर्स या मेलमध्ये दिलेल्या असतात. मात्र, दिलेल्या लिंकवर क्लिक करताच फोन हॅक होण्याचा धोका असतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election Result : प्रकाश आंबेडकर, AIMIM अन् अपक्ष, महाराष्ट्रात कोणाचा खेळ बिघडणार? गणित समजून घ्या...

स्टार प्रवाहच्या नायिकेची झी मराठीवर एंट्री; 'लक्ष्मी निवास' मालिकेत देणार पाठक बाईंना टक्कर; पाहा नवा प्रोमो

Mumbai Vidhansabha Result: दक्षिण मुंबईतील कौल नक्की कोणाला? मनसेमुळे लढतीत रंगत!

Jaggery Poha Recipe: सकाळी नाश्त्यात बनवा गोड गुळाचे पोहे, लगेच लिहा रेसिपी

AUS vs IND 1st Test: बुमराहने टॉस जिंकल्याने टीम इंडियाचा पर्थ कसोटीत विजयही पक्का? वाचा काय सांगतायेत रेकॉर्ड्स

SCROLL FOR NEXT