Royal Enfield Bullet 350 Details: Royal Enfield कडे ३५० सीसीपासून ते ६५० सीसीपर्यंत येणाऱ्या शानदार बाईक्स उपलब्ध आहेत. यापैकीच एक Royal Enfield Bullet 350 असून, ही कंपनीच्या सर्वात स्वस्त बाईकपैकी एक आहे. या बाईकची किंमत जवळपास २ लाख रुपये आहे. मात्र, डाउन पेमेंट करून तुम्ही खूपच कमी किंमतीत या बाईकला घरी घेऊन जाऊ शकता. Royal Enfield Bullet 350 च्या किंमत, इंजिन आणि स्पेसिफिकेशन्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.
Royal Enfield Bullet 350 ची किंमत
Royal Enfield Bullet 350 च्या टॉप मॉडेलची सुरुवाती किंमत १६३,३३८ रुपये (एक्स-शोरुम) आहे. बाईकची ऑन रोड किंमत १,८८,३३५ लाख रुपयांपर्यंत जाते. मात्र, या बाईकला तुम्ही फक्त २२ हजार रुपये डाउन पेमेंटवर घरी घेऊन जाऊ शकता.
२२ हजार रुपये डाउन पेमेंट केल्यावर तुम्हाला बँकेकडून १,६६,३३५ रुपये लोन मिळेल. यानंतर तुम्हाला ३ वर्ष दरमहिन्याला ५,३४४ रुपये ईएमआय भरावा लागेल.
Royal Enfield Bullet 350 बाईकमध्ये मिळेल पॉवरफुल इंजिन
Royal Enfield Bullet 350 मध्ये ३४६ सीसीचे सिंगल सिलेंडर ४ स्ट्रोक इंजिन देण्यात आले असून, हे एअर कूल्ड, फ्यूल इंजेक्टेड टेक्नोलॉजीसह येते. इंजिन ५ स्पीड गियरबॉक्ससह येते. कंपनीचा दावा आहे की, बाईक प्रती लीट ३७ किमी माइलेज देते.
दरम्यान, Royal Enfield Bullet 350 ही कंपनीच्या सर्वात स्वस्त बाईक पैकी एक आहे. ही कंपनीची भारतातील बेस्टसेलर बाईक आहे. पॉवरफुल इंजिनसोबतच यात इतरही शानदार फीचर्स मिळतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.